
पहिल्या दिवशी १७९ इच्छुकांचे अर्ज सादरअमरावती, 11 डिसेंबर (हिं.स.) आगामी महापालिका निवडणुकीत भाजपकडून लढण्यासाठी अनेक इच्छुक बाशिंग बांधून तयार आहे. अर्ज वितरणाच्या पहिल्या दिवशी राजापेठ स्थित शहर कार्यालयावर पदाधिकारी आणि कार्यकत्यांची मोठी गर्दी उसळली होती. यामध्ये माजी नगरसेवकांसह अनेक नवीन चेहऱ्यांनी हजेरी लावली होती. विशेषतः महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची झुंबड लक्षणीय होती.
यावेळी भाजपचे निवडणूक प्रमुख जयंत डेहनकर, माजी खा. नवनित राणा, शहराध्यक्ष डॉ नितीन धांडे, सरचिटणीस बादल कुळकर्णी, रवींद्र खांडेकर, भाजप प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, प्रा.दिनेश सूर्यवंशी आदींच्या उपस्थितीत सुमारे १७९ इच्छुकांनी अर्जाची उचल केली.
भाजपा कार्यालयात बुधवार १० ते १२ डिसेंबर २०२५ पर्यंत सर्व प्रभागांच्या इच्छुक उमेदवारांसाठी सकाळी १०.०० ते सायकाळी ५.०० वाजेपर्यंत हे फार्म उपलब्ध असणार आहेत. या फॉर्मसाठी सर्वसाधारण गटाकरिता १००० रुपये शुल्क आकारले जाणार असून राखीवगटा करिता अनु. जाती व अनु. जमाती ना.मा.प्र. तसेच महिला आरक्षण गटातील उमेदवारसाठी ५०० रु. शुल्क आहे.भरलेल्या अर्जासह 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी १०.०० वाजेपासूनप्रभागक्रमांक ०१ तेप्रभाग क्रमांक ११ च्या इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेतल्या जाणार आहे. तसेच १४ डिसेंबर २०२५ रोजी प्रभाग क्रमांक ११ ते प्रभाग क्रमांक २२ या प्रभातील इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखत सकाळी १०.०० वाजेपासून प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात यईल.भाजपकडून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांनी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज घेत दाखल करावा, असे आवाहन शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी