त्र्यंबक रोडवरील भूसंपादनाच्या प्रश्नावर 16 डिसेंबरला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक
नाशिक, 11 डिसेंबर (हिं.स.)। - सिंहस्थ कुंभ पर्वासाठी होणाऱ्या त्र्यंबक रोडवरील भूसंपादन संदर्भामध्ये येत्या मंगळवारी 16 डिसेंबर रोजी मंत्रालयामध्ये महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला शेतकरी आणि अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहे.
त्र्यंबक रोडवरील भूसंपादनाच्या प्रश्नावर ती 16 डिसेंबरला  दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक, शेतकऱ्यांच्या भेटीला यश


नाशिक, 11 डिसेंबर (हिं.स.)।

- सिंहस्थ कुंभ पर्वासाठी होणाऱ्या त्र्यंबक रोडवरील भूसंपादन संदर्भामध्ये येत्या मंगळवारी 16 डिसेंबर रोजी मंत्रालयामध्ये महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला शेतकरी आणि अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहे.

मागील सर्व साधारण दीड महिन्यापासून सिंहस्थ कुंभ पर्वच्या निमित्याने नाशिक त्रंबक रोडवरील जमीन भूसंपादनाच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून अतिक्रमण म्हणून संबोधित करून असलेले बांधकाम , घरे ही तोडून जागा ताब्यात घेण्याचे काम नाशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहे हे काम सुरू असतानाच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला नाशिक विकास प्राधिकरणाच्या या कामाला इगतपुरी व त्र्यंबक मधील आमदार हिरामण खोसकर यांनी देखील पुढाकार घेतला होता. या भागातील नागरिकांसाठी ते देखील आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते परंतु नासिक विकास प्राधिकरणाने हा सर्व विरोध डावलून आपले काम सुरू केले होते आणि त्या विरोधामध्ये या पंचक्रोशी मधील नागरिक, शेतकरी व्यवसायिक हे आंदोलनाला सुद्धा बसलेले होते त्यांचे आंदोलन सुरू होते या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन नाशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा व इतर अधिकाऱ्यांनी जाऊन त्यांचे उपोषण सोडले होते.

त्यानंतरही या भागातील शेतकरी नागरिक आणि व्यवसाय यांच्या समस्या सुटल्या नव्हत्या त्यासाठी म्हणून आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी या भागातील, गोरखनाथ चव्हाण संपत चव्हाण, एड.कैलास खाडबहाले ,लालचंद चव्हाण, प्रवीण शिरसाठ, गोरख वाजे व इतर शेकडो शेतकऱ्यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली त्यांना कसा अन्याय झालेला आहे विकास प्राधिकरणाने वर्षानुवर्ष असलेल्या जमिनी आणि घरे हे कसे अतिक्रमण म्हणून संबोधित करून शेतकऱ्यांचे नुकसान केलेले आहे याबाबतची माहिती दिली या सर्व माहितीच्या नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी म्हणून येत्या मंगळवारी 16 डिसेंबर रोजी सकाळी मंत्रालयामध्ये या परिसरातील शेतकरी नागरिक व्यावसायिक आणि संबंधित विभागाचे नाशिक व मुंबईतील अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्याचे निश्चित केले असून त्याबाबत संबंधित अधिकारी व शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे सांगण्यात आलेले आहे या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande