भटक्या श्वान नियंत्रणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अनुपालनासाठी बैठक संपन्न
नांदेड, 11 डिसेंबर (हिं.स.)। निवासी उपजिल्हाधिकारी, किरण अंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली, सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांच्या संदर्भात दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आवश्यक कार
भटक्या श्वान नियंत्रणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अनुपालनासाठी बैठक संपन्न


नांदेड, 11 डिसेंबर (हिं.स.)।

निवासी उपजिल्हाधिकारी, किरण अंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली, सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांच्या संदर्भात दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आवश्यक कार्यवाही करण्याबाबत संबंधित यंत्रणांची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत भटक्या श्वान नियंत्रण, निर्बीजिकरण, लसीकरण, निवारा व्यवस्था, संवेदनशील क्षेत्रांतील प्रतिबंधात्मक उपाय तसेच जनजागृती यांसंबंधी उपाययोजनांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठराविक मुदतीत कार्यवाही करून अनुपालन व पूर्ततेचा अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश बैठकीत देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande