डॉ. आंबेडकर खुले नाट्यगृहाच्या विकासासाठी १० कोटी निधीची मागणी!
अकोला, 11 डिसेंबर (हिं.स.)।अकोला शहरातील विदर्भातलं एकमेव व ऐतिहासिक “डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह” विकासकामासाठी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे १० कोटी रूपये निधी मंजूर करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक निलेश देव यांनी आज
P


अकोला, 11 डिसेंबर (हिं.स.)।अकोला शहरातील विदर्भातलं एकमेव व ऐतिहासिक “डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह” विकासकामासाठी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे १० कोटी रूपये निधी मंजूर करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक निलेश देव यांनी आज उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना निवेदनाद्वारे केली.

२०१५-१६ पासून प्रलंबित मंजुरी – अनेक शासनपत्रांचा संदर्भ

दिलेल्या निवेदनात 31 ऑगस्ट 2015 ते 19 ऑगस्ट 2016 दरम्यान विविध शासन कार्यालयांनी पाठविलेल्या पत्रव्यवहाराचा उल्लेख करून, खुले नाट्यगृहाच्या विकासासाठी मंजूर झालेला निधी फॉलो-अप अभावी अव्ययित राहिला असल्याचे निदर्शनास आणले आहे.

2016 मधील जिल्हा वार्षिक योजनेत प्राथमिक मंजुरी; मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय कार्यालयांचे पत्र; तसेच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाठविलेल्या पत्रांचा दाखला निवेदनात देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande