अल्पभूधारकांच्या न्यायासाठी आ. सुरेश धस यांचा पुढाकार
तांत्रिक चुका दुरुस्तीसाठी विशेष संधी देण्याची मागणी बीड, 11 डिसेंबर (हिं.स.)। बीड जिल्ह्यात फार्मर आयडीतील तांत्रिक चुकांमुळे अनेक अल्पभूधारक शेतकरी कागदोपत्री बहुभूधारक ठरत आहेत. त्यामुळे पोखरा योजना आणि विविध कृषी योजनांपासून वंचित राहण्याची वे
अल्पभूधारकांच्या न्यायासाठी आ. सुरेश धस यांचा पुढाकार


तांत्रिक चुका दुरुस्तीसाठी विशेष संधी देण्याची मागणी

बीड, 11 डिसेंबर (हिं.स.)। बीड जिल्ह्यात फार्मर आयडीतील तांत्रिक चुकांमुळे अनेक अल्पभूधारक शेतकरी कागदोपत्री बहुभूधारक ठरत आहेत. त्यामुळे पोखरा योजना आणि विविध कृषी योजनांपासून वंचित राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. या समस्येबाबत शेतकऱ्यांनी आ. सुरेश धस यांच्यासमोर व्यथा मांडली. यानंतर आ.धस यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राद्वारे दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

पाटोदा तालुक्यासह बीड जिल्ह्यात फार्मर आयडी प्रक्रियेत गंभीर तांत्रिक त्रुटी झाल्याचे उघड झाले आहे. तळे पिंपळगावचे सरपंच शशिकांत चौरे यांच्या 2 एकर 2 गुंठे क्षेत्रावर तब्बल 10 एकर नोंद झाली, तर सावरगाव घाट येथील भानुदास सानप यांच्या 2 एकर क्षेत्रावर 6 एकर दाखविण्यात आले. अशा चुकीच्या व वाढीव नोंदींमुळे प्रत्यक्षात अल्पभूधारक असलेले शेतकरी बहुभूधारक म्हणून नोंदले जाऊन योजनांपासून वंचित राहत आहेत. ही भीषण परिस्थिती शेतकऱ्यांनी आ.धस यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी तातडीने पुढाकार घेत महसूल मंत्र्यांना निवेदन दिले. फार्मर आयडी दुरुस्तीसाठी विशेष संधी देणे, चुकीच्या नोंदी सुधारण्यासाठी तांत्रिक यंत्रणेला स्पष्ट आदेश देणे आणि प्रक्रिया वेळबद्ध करण्याची मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे. आ.धस यांनी पत्रात नमूद केले आहे की, बीड जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकरी अल्पभूधारक असूनही चुकीच्या नोंदींमुळे बहुभूधारक ठरले आहेत. त्यामुळे पोखरा योजनेसह विविध लाभयोजनांचे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. हा अन्याय दूर करण्यासाठी तातडीने दुरुस्तीची कार्यवाही आवश्यक आहे.

महसूल मंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती समोर आली आहे. आवश्यक प्रशासनिक प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात अनुकूल संकेत मिळत असून, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये फार्मर आयडी दुरुस्तीबाबत आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande