
चंद्रपूर, 11 डिसेंबर (हिं.स.)। नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर–गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक क्षमतेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की या परिसरात तब्बल ३ लाख कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक येण्याची शक्यता असून याचा व्यापक फायदा स्थानिक विकासाला होणार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये आयरन-आधारित मोठा उद्योग उभारण्याची तातडीची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
ते म्हणाले, चंद्रपूरचे भौगोलिक स्थान, खनिजसंपत्ती आणि उपलब्ध संसाधने पाहता आयरन उद्योगासाठी हा भाग सर्वाधिक उपयुक्त आहे. असा उद्योग उभा राहिल्यास मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल आणि या भागात औद्योगिक वाढीस मोठे चालना मिळेल. या विषयात शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी सभागृहात केली.
--------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव