
बीड, 11 डिसेंबर (हिं.स.)।
येत्या गुरुवारपर्यंत विजेचा प्रश्न सुटला नाही तर विजेच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा गेवराई तालुक्यातील सरपंच शितल साखरे
यांनी प्रशासनाला दिला आहे.
विजेच्या अनियमित पुरवठ्याच्या विरोधात घोंडराईच्या सरपंच शितल साखरे यांच्या नेतृत्वात शुक्रवार (१२ डिसेंबर) रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. अशा इशारा महावितरण प्रशासनास निवेदनाव्दारे दिला आहे.
मागील दोन ते ते तीन महिन्यांपासून वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरीक त्रस्त झाले आहेत. या संदर्भात सरपंच शितल साखरे व इतरांनी सुरळीत विद्युत पुरवठ्यासाठी महावितरण व जिल्हा प्रशासनाकडे वारंवार
पाठपुरावा केला आहे. परंतु प्रशासनाने त्याची दखल घेतली नसल्याने विस्कळीत स्वरूपाच्या विद्युत पुरवठ्याचा नागरीकांना अद्यापही त्रास सहन करावा लागत आहे. नागरीकांची सहनशीलता आता संपली असून गुरुवार (११ डिसेंबर) पर्यंत प्रशासनाने विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास शुक्रवारी आंदोलन करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिक्षक बीड, पोलीस निरीक्षक गेवराई, कार्यकारी अभियंता बीड, अधीक्षक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, तहसीलदार गेवराई याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis