
नाशिक, 11 डिसेंबर (हिं.स.)
- दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) नाशिक लोकल सेन्टर तर्फे ऑउटस्टँडिंग पुरस्कारासह अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या अभियंत्यांचा वार्षिक अभियांत्रिकी पुरस्कार समारोह निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून वंदे भारत एक्सप्रेसचे जनक तसेच IRSME (निवृत्त महाव्यवस्थापक/ICF) चेन्नई डॉ. सुधांशू मणी तसेच दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), कोलकाता येथील निर्वाचित अध्यक्ष इंजि. मनीष एम. कोठारी यांच्या उपस्थित उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर नाशिक लोकल सेन्टर चे अध्यक्ष समीर कोठारी, मानद सचिव वेदांत राठी, आयोजक समितीचे नरेंद्र बिरार हे होते.
आधी भारतरत्न इंजि. डॉ एम विशेश्वरय्या यांना अभिवादन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) च्या नाशिक शाखेचे अध्यक्ष समीर कोठारी यांनी उपस्थितांचे स्वागत करतांना शाखेच्या गतिविधी विषयी सांगितले. आयोजन समितीचे प्रमुख इंजि. नरेंद्र बिरार यांनी मनोगत व्यक्त केले तसेच अवॉर्ड सिलेक्शन कमिटी चे अध्यक्ष इंजि. राजेश बन्सल यांनी निवड प्रक्रिये विषयी सांगितले.
यावर्षीचा आऊटस्टॅन्डींग इंजिनिअर् पुरस्कारहिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, ओझर चे सीईओ इंजि. साकेत चतुर्वेदी यांना अशोका बिल्डकॉन नाशिक यांच्या वतीने इंजि. अशोक कटारिया आणि इंजि. सतीश पारख अशोका बिल्डकॉन नाशिक यांच्या उपस्थितीत पुरस्कृत करण्यात आले. तर इंजिनिअरिंग अचिव्हमेंट पुरस्कार शिवानंदा इलेक्ट्रॉनिक नाशिक, यांच्या वतीने इंजि. एम . के . बिरमानी, संचालक - शिवानंदा इलेक्ट्रॉनिक नाशिक यांच्या उपस्थितीत
इंजि. अतुल एस. अडवदकर, डॉ. हेमराज रामदास कुमावत, डॉ. राजेंद्रकुमार गिरीधरिलाल तातेड,इंजि. सुनील दत्तू भोर, इंजि. सुरेंदर कुमार यांना गौरविण्यात आले.
तसेच युवा पुरुष अभियंत्यांसाठी प्रोत्साहनात्मक पुरस्काराने डॉ. अनिलकुमार दुलीचंद विश्वकर्मा, इंजि. अरिहंत संजय जैन,इंजि. अजिंक्य प्रतापराव कोठावले, डॉ. पराग जयंत मोंढे, इंजि. वासू मित्तल आणि महिला पुरस्काराने इंजि. आयुषी प्रणेश डुंगरवाल, डॉ. बिपासा बिमलेन्दु पात्रा, इंजि. स्नेहल अशोकराव इंगळे यांना गौरविण्यात आले.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना प्रमुख पाहुणे म्हणून वंदे भारत एक्सप्रेसचे जनक तसेच IRSME (निवृत्त महाव्यवस्थापक/ICF) चेन्नई डॉ. सुधांशू मणी यांनी वन्दे भारत ट्रेन ची कल्पना साकार करण्याचा प्रवास, मेक इन इंडिया बरोबर डिझाईन इन इंडिया हे गरजेचे आहे हे सांगितले.
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV