नाशिकमध्ये होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोच्या भूमिपूजन सोहळा संपन्न
नाशिक, 11 डिसेंबर (हिं.स.)। नरेडको नाशिक आयोजित होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 2025 या नाशिकमधील सर्वात मोठ्या गृहप्रदर्शनाच्या भूमिपूजन समारंभाचा शुभारंभ आज मंत्रघोषात डोंगरे वसतिगृह मैदान, गंगापूर रोड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभानंत
नाशिकमध्ये होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 2025 च्या भूमिपूजन सोहळा संपन्न


नाशिक, 11 डिसेंबर (हिं.स.)।

नरेडको नाशिक आयोजित होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 2025 या नाशिकमधील सर्वात मोठ्या गृहप्रदर्शनाच्या भूमिपूजन समारंभाचा शुभारंभ आज मंत्रघोषात डोंगरे वसतिगृह मैदान, गंगापूर रोड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभानंतर होमेथॉन एक्स्पोच्या तयारीला अधिकृत सुरुवात झाली असून नरेडको मेंबर्स मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या प्रसंगी नरेडको नाशिकतर्फे होमेथॉन प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी आगामी एक्स्पोविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “नाशिकच्या रिअल इस्टेट बाजारपेठेत गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय वाढ झाली आहे. ही प्रगती अधिक भक्कम करण्यासाठी, नागरिकांना एकाच ठिकाणी घरखरेदीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आणि गुंतवणुकीच्या नव्या वाटा ओळखून देण्यासाठी होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”

नाशिकमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाविन्य पूर्ण रिअल इस्टेट प्रदर्शनाचे आयोजन होत असल्याने बिल्डर्स आणि नागरिकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. या एक्स्पोमध्ये शहरातील आधुनिक निवासी प्रकल्प, व्यावसायिक संकुले, परवडणारी घरे, लक्झरी अपार्टमेंट्स, प्लॉट्स तसेच भविष्यातील विकास आराखड्यांची झलक पाहायला मिळणार आहे. अनेक नामांकित बिल्डर्स आणि डेव्हलपर्स या प्रदर्शनात सहभागी होणार असून, घरखरेदीदारांसाठी आकर्षक ऑफर्स व स्कीम्सही जाहीर केल्या जाणार आहेत.

“उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाया” या संकल्पनेवर आधारित भूमिपूजन सोहळा पार पडला. नरेडकोचे अध्यक्ष सुनील गवादे सांगितले की, “आजचा हा भूमिपूजन सोहळा नाशिकच्या विकासयात्रेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आगामी काळात नाशिकची रिअल इस्टेट बाजारपेठ आणखी विस्तारणार असून गुंतवणूकदार, बांधकाम व्यावसायिक आणि घर खरेदीदार—सर्वांसाठीच हा काळ लाभदायी ठरणार आहे.”

दरम्यान, या भव्य प्रदर्शनासाठी मंडपाची उभारणी मुंबईच्या जेस इंडिया या सुप्रसिद्ध कंपनीकडून करण्यात येणार असून, जेस इंडियाचे संचालक अजित ठक्कर हे या संपूर्ण कामाचे नेतृत्व करणार आहेत. विशाल, आधुनिक आणि आकर्षक डिझाइन असलेला हा मंडप नाशिककरांसाठी एक नवीन अनुभव ठरणार आहे.

सामाजिक बांधिलकी जपत या एक्स्पोत काही निवडक समाजसेवी संस्थांना नरेडकोतर्फे विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये **आदिवासी विकास मंडळाच्या आदिवासी बांधवांकडून तयार केलेल्या ‘साबरी प्रॉडक्ट्स’**चा समावेश असून, नाशिककरांना स्थानिक आदिवासी वस्तू खरेदी करण्याची आणि त्याद्वारे या कलाकारांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळणार आहे. तसेच, BSNL तर्फे एक्स्पो परिसरात मोफत वाय-फायसह अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचेही प्रसन्न सायखेकर यांनी सांगितले.

होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 18 ते 21 डिसेंबर दरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित करण्यात येणार असून, नाशिककरांसाठी घरखरेदी व गुंतवणुकीची सुवर्णसंधी असेल. येत्या काही दिवसांत एक्स्पोतील सहभागी प्रकल्प, खास ऑफर्स, विविध स्कीम्स आणि कार्यक्रमांची अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार आहे.अशी माहिती सचिव शंतनु देशपांडे यांनी दिली

नाशिकच्या विकासाचा नवा अध्याय म्हणून होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 2025 कडे शहरवासीयांची उत्सुकता वाढत असून, या एक्स्पोमुळे नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राला मोठी उभारी मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

या भूमिपूजन समारंभ प्रसंगी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवकुमार आवळकंठे BSNL चे महाप्रबंधक सारंग मांडवीकर, मा अभय तातेड,सह समन्वयक अभय नेरकर,उदय शहा, मर्जियान पटेल,खजिनदार भूषण महाजन,दीपक बागड, ॲड अजय निकम,अविनाश आव्हाड, विक्रम आव्हाड,आदी उपस्थितीत होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande