इंद्रायणी नदीत शेकडो मृत मासे; प्रदूषणाचा भीषण कहर
पुणे, 11 डिसेंबर, (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड भागातील दूषित रसायनयुक्त सांडपाणी मिसळत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेल्या इंद्रायणी नदीची गटारगंगा झाली असून, आळंदीतील इंद्रायणी नदीघाट, नवीन व जुन्या पुलाखाली शेकडो मृत माशांचा खच पडला आहे. जलचरां
इंद्रायणी नदीत शेकडो मृत मासे; प्रदूषणाचा भीषण कहर


पुणे, 11 डिसेंबर, (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड भागातील दूषित रसायनयुक्त सांडपाणी मिसळत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेल्या इंद्रायणी नदीची गटारगंगा झाली असून, आळंदीतील इंद्रायणी नदीघाट, नवीन व जुन्या पुलाखाली शेकडो मृत माशांचा खच पडला आहे. जलचरांना जगणे देखील मुश्कील झाले असल्याचे चित्र आहे.

इंद्रायणी नदीपात्रात मृत अवस्थेतील मासे मोठ्या प्रमाणात आढळू लागले आहेत. नदीतील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. इंद्रायणी नदीचे पाणी खराब झाल्याने सिद्धबेट बंधाऱ्यातून ढापे काढत पाणी सोडण्यात आले. यावेळी सांडव्यावर अक्षरशः फेसयुक दूषित पाणी पांढरा शुभ रंगाने वाहताना दिसून येते. असा सर्व प्रकार घडत असताना नदीप्रदूषणावर नियंत्रण ठेवणारे संबंधित प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कसलीच कारवाई करताना दिसून येत नसल्याचा आरोप आळंदीकर करत आहेत. नदीप्रदूषणाला नक्की कारणीभूत कोण आणि त्यावर कारवाई कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande