
भाजप नेत्या डॉ.अर्चना पाटील चाकुरकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; तात्काळ कारवाईची मागणी
लातूर, 11 डिसेंबर (हिं.स.)। लातूर MIDC च्या बेजबाबदारपणामुळे हरंगुळ (बु.) आणि वरवंटी (बसवंतपूर) परिसरातील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. MIDC मधील प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नाल्याद्वारे लोकवस्तीत सोडले जात असल्याने परिसरात प्रदूषणाचा आणि त्वचारोगांचा भयंकर फैलाव झाला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या डॉ. अर्चना पाटील चाकुरकर यांनी या गंभीर प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
डॉ. चाकुरकर यांनी स्पष्ट केले MIDC च्या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या अंगावर पुरळ आणि ॲलर्जी मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. लहान मुले आणि महिलांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. वारंवार तक्रारी करूनही व्यवस्थापन झाले नाही, त्यामुळे हा थेट नागरिकांच्या जीविताचा प्रश्न बनला आहे.
या निवेदनात, दूषित पाणी सोडणे तात्काळ बंद करून, त्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) पर्यावरण अधिनियम १९८७ अंतर्गत MIDC वर कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. चाकुरकर यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis