
अमरावती, 11 डिसेंबर (हिं.स.) राज्यातील शिक्षकांवरील टीईटी अनिवार्यता सक्तीबाबत पुनर्विचार करण्याची मागर्णा अमरावती लोकसभा मतदार संघाचे खासदार बळवंत वानखडे,लातूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डाॅ.शिवाजीराव काळगे,वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर काळे,डाॅ.कल्यान काळे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली आहे. उच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निर्णयानुसार सेवेत पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक असलेल्या सर्व शिक्षकांना १ सप्टेंबर २०२७ पर्यंत टीईटी उत्तीर्ण करणे सक्तीचे ठरविले आहे. अपयश आल्यास सेवा समाप्त करण्याचा आदेश असल्याने राज्यातील लाखो शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.संघटनांचे म्हणणे आहे की २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांनी त्या काळार्ताल प्रचलित शैक्षणिक पात्रतेनुसार सेवा स्वीकारली असून आता टीईटीची सक्ती लादणे हा स्पष्ट अन्याय आहे. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये मानसिक, सामाजिक आणि आर्थिक तणाव वाढला असून कुटुंबांसह विद्यार्थ्यांवरही त्याचा परिणाम होत आहे.या परिस्थितीची दखल घेत शिक्षक समिती प्रतिनिधींनी खा.बळवंत वानखडे,डाॅ.शिवाजीराव कालके, खासदार अमर काळे,खा.डाॅ.कल्यान काळे यांना निवेदन दिले. त्यानंतर खासदार वानखडे, काळे, काळगे, काळेयांनी संसद सत्रादरम्यान शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना लेखी निवेदन देऊन आरटीईच्या कलम २३(२) मध्ये सुधारणा करावी, तसेच २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटीमधून सूट द्यावी, अशी मागणी केली. शिक्षणमंत्री प्रधान यांनी या प्रकरणी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. खा.डॉ शिवाजीराव काळगे(लातूर ),खा.अमर काळे(वर्धा) व खा.बळवंत वानखडे (अमरावती)खा.डाॅ.कल्यान काळे(जालना) या खासदार महोदयांनी शिक्षक टीईटी बाबतचे पत्र माननीय धर्मेंद्र प्रधान शिक्षणमंत्री महोदय,भारत सरकार दिले आहे.शिक्षक समितीने केलेल्या मागणीचा विचार करावा असे सदर पत्रात नमुद आहे.शिक्षक समितीचे राज्य नेते उदयजी शिंदे,राज्याध्यक्ष मा.विजयजी कोंबे व राज्य सरचिटणीस मा.राजन जी कोरगावकर यांच्या सूचनेनुसार समितीचे वसंत घोगरे यांनी या संदर्भात खासदार डाॅ.शिवाजीराव काळगे, आल्हाद तराळ यांनी बळवंत वानखडे, अमर काळे यांना विजय कोंबे, डाॅ.कल्यान काळे यांनी लेखी निवेदन दिले होते.तसेच राज्यातील सर्व खासदार लोकसभा व राज्यसभा सदस्य यांना निवेदन दिले होते.असे प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी