मंद्रूपच्या अस्वच्छतेबाबत झेडपी सीईओ जंगम यांची नाराजी
सोलापूर, 11 डिसेंबर (हिं.स.)। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील बस स्थानकादरम्यान असलेल्या घाणीच्या साम्राज्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी नाराजी व्यक्त केली आहे.दक्षिण सोलापुरात सीना भीमा नदीच्या खोऱ्यात
ZP news solpaur


सोलापूर, 11 डिसेंबर (हिं.स.)।

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील बस स्थानकादरम्यान असलेल्या घाणीच्या साम्राज्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी नाराजी व्यक्त केली आहे.दक्षिण सोलापुरात सीना भीमा नदीच्या खोऱ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या मंद्रूप गावचे नागरीकरण वाढत आहे. मंद्रूप मोहोळ बायपास महामार्गावर लोकसेवा हायस्कूल ते जोडमोटेवस्ती आणि विठाई नगर ते माळकोटे फाटा यादरम्यान व्यापारी पेठ वाढत चालली आहे. मंद्रूप तांडा ते बसस्थानक दरम्यान दुकाने वाढली आहेत. अशा स्थितीत बस स्थानक ते ग्रामीण रुग्णालय पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा घाणीचे साम्राज्य वाढत चालले आहे. या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना या घाणीचे दर्शन होते ही बाब मंद्रूपकरांसाठी भूषणावह नाही. जिल्हा परिषद मराठी शाळा ते बसस्थानक दरम्यान तर विखुरलेला कचरा यामुळे गावाच्या सौंदर्याला बाधा येत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवली तरी या परिसरातील नागरिकांनी स्वयंशिस्त लावून घेणे गरजेचे झाले आहे. या दरम्यान असणाऱ्या दुकान मालकांना स्वच्छतेबाबत आणखी जागरूक करणे गरजेचे झाले आहे. कचरा संकलित करण्यासाठी नागरिकांना उद्युक्त करणे गरजेचे झाले आहे. माझी वसुंधरा या कार्यक्रमात राज्यात प्रथम आलेल्या गावाचे ही अवस्था असेल तर नागरिकांनी याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे मत जंगम यांनी व्यक्त केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande