
पुणे, 11 डिसेंबर, (हिं.स.)। स्वारगेट मेट्रोस्थानकावरून बसस्थानकाला जोडणारा भुयारी पादचारी मार्गाचे बांधकाम पुर्ण झाले असून तो लवकरच सेवेत दाखल होईल. या मार्गाची दिल्लीतील रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सुरक्षा तपासणी केल्यावर तो वापरात येईल.स्वारगेट आणि मेट्रो स्थानक भूमिगत मार्गाने जोडल्यावर स्वारगेटवर असणारी कमालीची गर्दी आणि कोंडी कमी होईल.
सध्या स्वारगेट स्थानकात जाण्यासाठी चौक ओलांडावा लागतो. या चौकात नेहमी मोठी गर्दी असते. दुचाकींपासून अवजड वाहनांपर्यंत सर्व वाहनांची वाहतूक येथे सुरू असते. त्यामुळे येथे जीव मुठीत धरून चौक ओलांडावा लागतो. नव्या भूमिगत मार्गाने स्वारगेट आणि मेट्रो स्थानक परस्परांशी अत्यंत सुरक्षित पद्धतीने जोडले जातील.ही दोन मोक्याची ठिकाणे भूमिगत मार्गाने जोडल्यावर पादचारी नागरिकांची मोठी सोय होणार आहे. मेट्रो आता पुण्याच्या सवयीची होत असल्याने विविध भागाबरोबर स्वारगेटला मेट्रोने येणाऱ्यांची संख्या मोठी असते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु