पुणे - मंचर वनपरिक्षेत्रात बिबट्यांसाठी ५१ पिंजरे
पुणे, 11 डिसेंबर, (हिं.स.)। आंबेगाव तालुक्यातील मंचर वनपरिक्षेत्रात असलेल्या चार परिमंडळातील एकूण ५५ गावांपैकी ३० गावांत ५१ पिंजरे बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाने सज्ज ठेवले आहेत. त्यातील २५ पिंजरे बिबट्यांचे हॉटस्पॉट झालेल्या निरगुडसर, गावडेवाडी
पुणे - मंचर वनपरिक्षेत्रात बिबट्यांसाठी ५१ पिंजरे


पुणे, 11 डिसेंबर, (हिं.स.)। आंबेगाव तालुक्यातील मंचर वनपरिक्षेत्रात असलेल्या चार परिमंडळातील एकूण ५५ गावांपैकी ३० गावांत ५१ पिंजरे बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाने सज्ज ठेवले आहेत. त्यातील २५ पिंजरे बिबट्यांचे हॉटस्पॉट झालेल्या निरगुडसर, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, अवसरी खुर्द, मंचर, वडगाव काशिंबेग, खडकी, पिंपळगाव या आठ गावांत बसविले आहेत.

जुन्नर वनविभागातील मंचर वनपरिक्षेत्रात असलेला ऊसपट्टा बिबट्यांचे आश्रयस्थान ठरला आहे. तसेच, या गावांजवळून घोड आणि मीना नदीचे पात्र आहे. त्यातून या गावांचा परिसर हिरवागार असतो. त्यामुळे या परिसरात बिबट्यांना पिण्यासाठी पाणी आणि सावज सहज मिळते.त्यामुळे या परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. या वनपरिक्षेत्रात ५५ गावे येतात. ती कळंब, वळती, धामणी आणि मंचर या चार वन परिमंडळात विभागलेली आहेत. येथील बिबट्यांवर नियंत्रण आणण्यासाठी वनविभागाची यंत्रणा प्रयत्न करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande