
नांदेड, 11 डिसेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील उस्माननगर आणि मुदखेड पोलीस व महसूल पथकाने येळी, महाटी शिवारात अवैध वाळू उपसा करणाऱ्या विरोधात १० डिसेंबर रोजी संयुक्त कारवाई केली. यावेळी तब्बल २ कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यातआला. तो जिलेटीनच्या साह्याने नष्ट करण्यात आला.
उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार, पोलीस उपनिरीक्षक सुनील सूर्यवंशी, , तहसीलदार परळीकर मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने येळी, महाटी शिवारातील गोदावरी नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्याविरुद्ध छापा टाकला.
यावेळी वाळू उपसा करणारे इसम पथकाला पाहून पळून गेले. पथकाने ७ मोठे लोखंडी फायबर बोट, ३ छोटे लोखंडी इंजिन बोट असा एकूण २ कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तो मुद्देमाल जिलेटिनच्या साह्याने जागीच नष्ट करण्यात आला.
उपरोक्त साहित्याच्या मालकांची माहिती घेऊन गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू होती
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis