भारतीय रक्तविज्ञान शास्त्र संस्थेच्या राष्ट्रीय समन्वयकपदी डॉ. शंकर मुगावे
परभणी, 11 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय रक्तविज्ञान शास्र संस्था नवी दिल्ली या संस्थेच्या राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान समन्वयकपदावर डॉ. शंकर मुगावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय रक्तविज्ञान शास्र संस्थेचे डॉ. युद्धबीर सिंह यांनी भारत
भारतीय रक्तविज्ञान शास्र संस्थेच्या राष्ट्रीय समन्वयकपदी डॉ. शंकर मुगावे


परभणी, 11 डिसेंबर (हिं.स.)।

भारतीय रक्तविज्ञान शास्र संस्था नवी दिल्ली या संस्थेच्या राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान समन्वयकपदावर डॉ. शंकर मुगावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय रक्तविज्ञान शास्र संस्थेचे डॉ. युद्धबीर सिंह यांनी भारतात स्वैच्छिक रक्तदान वाढवण्यासाठी चालविल्या जाणाऱ्या ऐच्छिक रक्तदान चळवळी अंतर्गत ही जबाबदारी बै.जी.शासकिय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रूग्णालय पुणे येथील समाजसेवा अधिक्षक विभागप्रमुख डॉ. शंकर मुगावे यांच्यावर सोपवली आहे.

डॉ. मुगावे हे स्वैच्छिक रक्तदान चळवळी द्वारे भारतातील युवकांना सहभागी करण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठी विविध उपक्रम राबवणार आहेत.

या उपक्रमांमध्ये महाविद्यालये, उद्योग, IT कंपन्या, युनियन, स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब, लायन्स क्लब आणि इतर अनेक संस्थांमध्ये सामूहिक समुपदेशन आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचा समावेश असेल. तसेच स्वैच्छिक रक्तदानाशी संबंधित जनजागृती करणे आणि विविध गैरसमज दूर करण्यासाठीही डॉ . मुगावे कार्य करणार आहे.

डॉ. युद्धबीर सिंह यांनी डॉ ‌ शंकर मुगावे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समन्वयाखाली भविष्यात स्वैच्छिक रक्तदानामध्ये राष्ट्रीय स्तरावर मोठी वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

डॉ. शंकर मुगावे यांचे रक्तदान चळवळीत खूप मोठे योगदान आहे. ते स्वतः नियमित स्वैच्छिक रक्तदान करतात. त्यांचे आजतागायत एकशे सात वेळा स्वैच्छिक रक्तदान झाले आहे. ते सध्या वर्षातून तीन वेळा स्वैच्छिक रक्तदान करत असतात. त्यांच्या रक्तदान प्रबोधनातून आणि रक्तदान या विषयांतील अभ्यास व संशोधनातून त्यांनी लाखो रक्तदात्यांना ऐच्छिक रक्तदान करण्यासाठी योग्य समुपदेशन केले आहे. आजतागायत त्यांनी पाच लाख ऐच्छिक रक्तदात्यांचे रक्त संकलन करून घेतले आहे.

त्यांनी रक्तपेढी चार समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधनात्मक अभ्यास करून सार्वजनिक आरोग्यातील रक्तपेढीचा सहभाग याविषयांवर पीएच.डी. मिळवणारे ते भारतातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.

यासर्व रक्तदान चळवळीतील कार्यासाठी त्यांना शासनाच्या सुवर्ण पदकांसहित विविध संस्थांचे आणि शासनाच्या चाळीस च्यावर पुरस्कार मिळवले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande