पीएमआरडीए : नद्या स्वच्छ, प्रदूषणमुक्त करणे आणि दर्जेदार घरे देण्याचा संकल्प
पुणे, 11 डिसेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत नागरी सुविधा देण्याबरोबरच नव्या वर्षात नद्या स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करणे आणि दर्जेदार घरे देण्याचा संकल्प पीएमआरडीएने सोडला आहे. यासाठी सुमारे 4 हजार 424 कोटी रुपये खर्चाच्या योजना राबविण्यात ये
PMRDA


पुणे, 11 डिसेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत नागरी सुविधा देण्याबरोबरच नव्या वर्षात नद्या स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करणे आणि दर्जेदार घरे देण्याचा संकल्प पीएमआरडीएने सोडला आहे. यासाठी सुमारे 4 हजार 424 कोटी रुपये खर्चाच्या योजना राबविण्यात येणार आहेत. या योजनांद्वारे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या नद्यांचे प्रदूषण हटवून त्या स्वच्छ-सुंदर करण्याबरोबरच ग्रामीण भागातही विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. या योजनांमुळे पीएमआरडीए क्षेत्राच्या विकासाला एक नवी दिशा मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) ने महानगर क्षेत्रातील नागरी जीवनमान उंचावण्यासाठी तसेच, सुनियोजित शहर विकासाच्या उद्दिष्टाने 4 हजार 424 कोटी रुपयांचे महत्त्वूपर्ण प्रकल्प हाती घेणार आहे. नागरिकांना आवश्यक नागरी सेवा आणि दर्जेदार गृहप्रकल्प उभे करणे. त्याचबरोबर नद्या प्रदूषणमुक्त करण्यासारखे महत्त्वाचे प्रकल्प सुरू केले जाणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande