
नांदेड, 11 डिसेंबर, (हिं.स.)। प्रशांती सार्वजनिक वाचनालय, आनंद नगर यांच्यावतीने, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित श्री सत्य साईबाबा प्राथमिक विद्यालय, आनंद नगर येथे बालवाचक सभासद सत्कार, फिरते वाचनालय (साखळी) योजना शुभारंभ व शाळा दत्तक योजना कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ. वा. सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना “वाचनाने बुद्धीचा विकास होतो आणि स्मरणशक्ती तेज होते” असे मत व्यक्त करून वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.
वाचनालयाचे अध्यक्ष रावसाहेब शेंदारकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुस्तकांकडे ओढ निर्माण करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक अष्टेकर एस. एस., शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis