भाजपच्या तिकिटासाठी  काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही वेटिंगवर ?
पुणे, 11 डिसेंबर, (हिं.स.)। महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे सुमारे अडीच हजार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची छाननी करून प्रभाग निहाय इच्छुक उमेदवारांची यादी बुधवारी रात्री पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवल्याचे पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्य
bjp


पुणे, 11 डिसेंबर, (हिं.स.)। महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे सुमारे अडीच हजार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची छाननी करून प्रभाग निहाय इच्छुक उमेदवारांची यादी बुधवारी रात्री पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवल्याचे पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यानुसार पुढील प्रक्रिया केली जाणार आहे, तसेच प्रभाग निहाय या उमेदवारांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. भाजपकडून दोन दिवसांपूर्वी हे अर्ज वाटप करण्यात आले होते. त्यानंतर अर्ज सादर करण्याची बुधवारी अखेरची मुदत होती. या मुदतीत संध्याकाळपर्यंत जवळपास सर्वांनीच अर्ज सादर केले असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

भाजपचे अर्ज घेण्यासाठी शहरातील भाजप वगळता इतर पक्षातील आजी माजी आमदारांच्या कुटुंबांतील सदस्यांनीही अर्ज घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, तसेच रिपाइंच्याही इच्छुकांचाही समावेश आहे. प्रभाग रचना आणि त्यानंतर प्रभाग निहाय आरक्षण आणि आता प्रारूप मततदार याद्यांमध्ये अनेक इच्छुकांची कोंडी झाली असून, तयारी केलेले प्रभाग भाजपसाठी अनुकूल आहेत.त्यामुळे महापालिकेची पायरी चढण्यासाठी भाजपचे तिकीट मिळावे, यासाठी वेगवेगळ्या पक्षांतील इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. त्यानंतर आता हे इच्छुक पक्ष प्रवेशाच्या तयारीत आहेत, तर भाजपकडून आयत्यावेळी सक्षम उमेदवार आल्यास त्याला अर्ज भरलेला नसला, तरी तिकीट दिले जाईल, असेही सांगण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande