
कोल्हापूर, 11 डिसेंबर (हिं.स.)।
दाट लोकवस्तीतुन गेलेली ११००० के.व्ही. विद्युत तारेबाबत वीजवितरण कंपनीने नागरिकांच्या सुरक्षेतेकडे गांर्भीयाने पाहणे गरजेचे आहे. फक्त वसुलीमध्ये तत्परता असणाऱ्या वीजवितरण कंपनीने नागरीकांना सुरक्षेतची हमी देणेही गरजेचे आहे. म्हणून उचगावातील नागरीवस्तीतील इमारतींना लागून असणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत तारा दूर कराव्यात अशा मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने वीजवितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता दतात्रय भणगे यांना देण्यात आले.
तालुका प्रमुख राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की उचगांव हे मोठी लोकसंख्या व दाटीवाठीची लोकवस्ती असलेली करवीर तालुक्यातील सर्वांत मोठे गांव उचगांव मध्ये मंगेश्वर कॉलनी मध्ये इमारतीला अगदी चिकटून असलेल्या ११००० के. व्ही. असणाऱ्या विजेची तार त्या तारेला चिकटून सार्थक वळकुंजे हा १६ वर्षाचा युवकाचा दुर्देव अंत झाला. तसेच उजळाईवाडी येथे बालाजी पार्क मध्ये मोहम्मद अफान बागवान या १३ वर्षीय युवकाचा ही दुर्देव अंत झाला सध्या कोल्हापूर शहरा-शेजारील गावे उचगांव, उजळाईवाडी येथे दाठ लोकवस्ती होत असताना विजवितरण कार्यालय याबाबत कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही. आता दोघांचा मृत्यू झाला असून आणि किती मृत्यूची वाट विजवितरण कार्यालय बघणार आहे का?
या तारांच्या मुळे झालेल्या अपघातात मृत झालेल्या सार्थक वळकुंजे व मोहम्मद अफान बागवान या मुलांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई म्हणून ५०, ५० लाख रूपये देणे गरजेचे आहे व भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये म्हणून नागरी वस्तीत घरालगतच्या असणाऱ्या धोकादायक अतिउच्च दाबाच्या विदयुत वाहिनीसाठी विजवितरणने पर्यायी व्यवस्था करावी अशी करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे.
यावेळी बोलताना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की गेल्या दोन महिन्यांमध्ये दोन मुलांचा मृत्यू होऊनही वीज वितरण अधिकारी शांत कसे बसू शकतात आणखी किती निष्पाप नागरिकांचे बळी गेल्यानंतर महावितरणला जाग येणार आहे. शहराशेजारी असणारी उंचगाव, गांधीनगर, सरनोबतवाडी, उजळाईवाडी अशी अनेक मोठमोठी गावे व तेथे वाढती लोकसंख्या दाटीवाटीत असणाऱ्या वस्त्या काही ठिकाणी ११००० के.व्ही च्या विद्युत तारा इमारतीला चिटकून आहेत व काही ठिकाणी इमारतीवरून गेल्या आहेत यावर कोणत्या उपाययोजना महावितरण कडून केल्या गेल्या. महावितरण विज बिल वसुलीसाठी सर्वात तत्पर असे खाते मानले जाते मात्र लोकांच्या सुरक्षेसाठी ही तत्परता का दाखवली जात नाही असा सवाल राजू यादव यांनी केला. यावर लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाहीत तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. तसेच महावितरण हे वसुलीत तत्पर असल्याने सर्वात श्रीमंत खाते मानले जाते त्यामुळे मृत्यू पावलेल्या दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत महावितरण ने द्यावी अशी ही मागणी यावी करण्यात आली..
यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की शहराशेजारील असणाऱ्या सर्व गावांचा सर्वे करून धोकादायक असणाऱ्या वीजतारांबाबत योग्य त्या उपाययोजना लवकरात लवकर करू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले...
यावेळी राजू यादव करवीर तालुकाप्रमुख, पोपट दांगट उपजिल्हाप्रमुख, अवधूत साळोखे उपजिल्हाप्रमुख, राजू सांगावकर कामगार सेना जिल्हाप्रमुख, राहुल गिरुले उपतालुकाप्रमुख, योगेश लोहार युवासेना तालुकाप्रमुख, दत्ता फराकटे वाहतूक सेना तालुकाप्रमुख,कैलास जाधव फेरीवाला संघटना तालुकाप्रमुख बाळासो नलवडे फेरीवाला उपतालुकाप्रमुख सोमनाथ साठे, सागर पाटील, दीपक पोपटानी फ्रेम वाला, सुनील पारपाणी, आबा जाधव, अजित चव्हाण, बाबुराव पाटील रामराव पाटील, फिरोज मुल्लानी आदी शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar