
सोलापूर, 11 डिसेंबर (हिं.स.)।
प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात आता ट्विस्ट निर्माण झाला आहे. डॉ. वळसंगकर यांच्यासह एकूण सात जणांचे १ डिसेंबर २०२४ ते १ मे २०२५ पर्यंतचे ‘सीडीआर’ (कॉल डिटेल्स रिपोर्ट) व मोबाईलचे टॉवर लोकेशन संबंधित मोबाईल कंपन्यांच्या नोडल अधिकाऱ्यांनी १७ जानेवारीपर्यंत न्यायालयात सादर करावे, असा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी दिला आहे. त्यामुळे पोलिसांना आता या कॉलच्या अनुषंगाने अधिक तपास करावा लागू शकतो.डॉ. वळसंगकर यांनी १८ एप्रिल रोजी राहत्या घरात गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. यात संशयित आारोपी मनीषा मुसळे यांना अटक झाली. पोलिसांना दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले, मनीषाचे वकील प्रशांत नवगिरे यांच्या युक्तिवादामुळे त्यांचीच जामिनावर मुक्तता झाली. त्यानंतर मनीषाने न्यायालयात दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड