'मिशन कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत शिवसेना इच्छुक उमेदवारांची कार्यशाळा
कोल्हापूर, 11 डिसेंबर (हिं.स.)। आगामी महानगरपालिका / जिल्हापरिषद निवडणुका लढविण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी किंबहुना निवडणूक पूर्वीची रणनिती आखण्यासाठी इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मिशन कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत शिवसेना इच्छ
आ. राजेश क्षीरसागर यांच्यातर्फे कार्यशाळा


कोल्हापूर, 11 डिसेंबर (हिं.स.)।

आगामी महानगरपालिका / जिल्हापरिषद निवडणुका लढविण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी किंबहुना निवडणूक पूर्वीची रणनिती आखण्यासाठी इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मिशन कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या कार्यशाळेचे उद्या दि.१२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

शिवसेना मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभरात शहर आणि गावपातळीवर धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष सुरु करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण कार्यशाळा आणि शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

निवडणुकीपूर्वी प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्या मार्गी लावणे, मतदारापर्यंत पक्षाचे काम, शासकीय योजना पोहचवून जनसंपर्कातून वातावरण निर्मिती करण्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत महत्वाची ठरणार आहे. याप्रसंगी शिवसेना पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसह त्यांच्या प्रतिनिधीना निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, कायदे तज्ञांचे सल्ले, खर्च हिशोबाचे प्रशिक्षण आदी देण्यात येणार आहे. या कार्यशाळेस शिवसेना पक्षाचे निवडणूक राज्य समन्वयक वैभव वाघ आणि मयूर कदम प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. तरी या कार्यशाळेस शिवसेनेच्या सर्व इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande