सोलापूर - वाहतुकीसाठी मरिआई चौकातून शेटे नगराकडे दुचाकी, रिक्षांनाच परवानगी
सोलापूर, 11 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूर शहरातील शेटे नगराजवळील रेल्वे बोगदा अरुंद आहे. त्यामुळे मरीआई चौक ते शेटेनगर या मार्गावरून आता चारचाकी वाहने जाणार नाहीत. पण, चारचाकी वाहने शेटे नगराकडून मरिआई चौकाकडे येऊ शकतात, असे नियोजन वाहतूक पोलिसांनी के
सोलापूर - वाहतुकीसाठी मरिआई चौकातून शेटे नगराकडे दुचाकी, रिक्षांनाच परवानगी


सोलापूर, 11 डिसेंबर (हिं.स.)।

सोलापूर शहरातील शेटे नगराजवळील रेल्वे बोगदा अरुंद आहे. त्यामुळे मरीआई चौक ते शेटेनगर या मार्गावरून आता चारचाकी वाहने जाणार नाहीत. पण, चारचाकी वाहने शेटे नगराकडून मरिआई चौकाकडे येऊ शकतात, असे नियोजन वाहतूक पोलिसांनी केले आहे.सोलापूर शहरातील ५४ मीटर रस्त्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने मरीआई चौक ते शेटेनगर आणि मोदी बोगदा अशा ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचे बुधवारी दिसून आले. यामुळे वाहतूक नियमानासाठी शेटे नगराजवळील टी पॉईंट, शेटेनगर पुलाजवळ दोन्ही बाजूला, नागोबा मंदिर, राम नगरकडून वळसंगकर हॉस्पिटलमध्ये जाणारा रस्ता आणि मोदी चौकीजवळ, प्रत्येकी दोन वाहतूक अंमलदार (सेक्टर अधिकारी) नेमण्यात आले आहेत. सकाळी ९ ते रात्री ९ अशी ड्युटी त्यांना देण्यात आली आहे. दरम्यान, ५४ मीटर रस्ता शुक्रवारी वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande