तिवसा येथे महामार्गावर अपघात टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी
अमरावती, 11 डिसेंबर (हिं.स.)तिवसा शहर नॅशनल हायवे वर आहे शहरात चार पाच ठिकाणी रस्ता दुभाजक असून या ठिकाण वरून नागरिक रस्ता ओलांडतात शिवाय रस्त्यालगत शाळा महाविद्यालय आहे शाळा सुरू होताना आणि सुट्टी झाल्यावर विद्यार्थ्यांची गर्दी होते रस्ता ओलांडतान
तिवसा येथे महामार्गावर अपघात टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा_      भाजपा महिला आघाडी तिवसा चे पोलिस स्टेशन तिवसा येथे निवेदन


अमरावती, 11 डिसेंबर (हिं.स.)तिवसा शहर नॅशनल हायवे वर आहे शहरात चार पाच ठिकाणी रस्ता दुभाजक असून या ठिकाण वरून नागरिक रस्ता ओलांडतात शिवाय रस्त्यालगत शाळा महाविद्यालय आहे शाळा सुरू होताना आणि सुट्टी झाल्यावर विद्यार्थ्यांची गर्दी होते रस्ता ओलांडताना रस्ता दुभाजकावर नेहमी अपघात होतात त्यामुळे या ठिकाणी किमान शाळेच्या वेळेत ठीक ठिकाणी वाहतूक नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त नियमित ठेवण्यात यावा जेणे करून अपघात टाळण्यासाठी मदत होईल शालेय विद्यार्थ्यांना नुकसान होणार नाही त्याच सोबत सुरक्षेच्या दृषटिकोनातून अत्यंत महत्वाचे असून यावर त्वरित कारवाई करण्यात यावी त्याच प्रमाणे शहरात आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर करण्या साठी पोलिस प्रशासनाने सुद्धा प्रयत्न करावे अशा अनुषंघांचे निवेदन तिवसा तुलुका महिला आघाडी ग्रामीण व तिवसा शहर यांचे वतीने देण्यात आले.

यावेळी तिवसा तालुका महिला अध्यक्ष सौ मयुरी सचिन राऊत विजया ताई वानखडे मनीषा ताई तवर सरचिटणीस निलिमा ताई समरीत तिवसा शहर अध्यक्ष सौ वंदना ताई गोंडसे माधुरी गंधे शैला ताई गोंडसे पंचफुला धोटे योगिता गोंडसे शांताबाई साबळे संगीता बेलसरे उपस्थीत होत्यात्यावेळी सचिनभाऊ राऊत वैभव भोंबे अजय केने यांनी सुद्धा सविस्तर चर्चा करून यावर सकारात्मक पावले उचलावी असे सांगितले .

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande