ठाणे - जिल्हा तांत्रिक सेवा (लेखा) संवर्गातील तिन्ही अधिकाऱ्यांना महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेत पदोन्नती
ठाणे, 11 डिसेंबर, (हिं.स.)। जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग–३ (लेखा) संवर्गातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, लेखा अधिकारी, गट-ब (राजपत्रित) या उच्च पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीनंतर संबंधित अधिकाऱ्यांना लेखा
ठाणे - जिल्हा तांत्रिक सेवा (लेखा) संवर्गातील तिन्ही अधिकाऱ्यांना महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेत पदोन्नती


ठाणे, 11 डिसेंबर, (हिं.स.)। जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग–३ (लेखा) संवर्गातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, लेखा अधिकारी, गट-ब (राजपत्रित) या उच्च पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीनंतर संबंधित अधिकाऱ्यांना लेखा अधिकारी या जबाबदारीचे पद मिळणार असून, त्यांच्या सेवेत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग वाटप नियम, २०२१ मधील तरतुदीनुसार खालीलप्रमाणे महसूल विभागानुसार पदस्थापना करण्यात आली आहे:

पदोन्नत अधिकारी व पदस्थापना

१) नारायण सुरपा गावित

• महसूल विभाग : कोकण–२

• पदस्थापना : लेखा अधिकारी, प्रादेशिक दुग्ध विकास अधिकारी, मुंबई (कोकण) विभाग, नवी मुंबई

२) पांडुरंग कृष्णाजी कोरडे

• महसूल विभाग : कोकण–१

• पदस्थापना : लेखा अधिकारी, जल जीवन मिशन, पालघर

३) संतोष रघुनाथ वंजारी

• महसूल विभाग : कोकण–२

• पदस्थापना : लेखा अधिकारी, मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्याचा विकास – दक्ष प्रकल्प, मुंबई

जिल्हा परिषद, ठाणे तर्फे तिन्ही अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीचा, प्रामाणिक सेवेचा आणि आर्थिक शिस्तीच्या कामकाजातील योगदानाचा सन्मान म्हणून ही पदोन्नती देण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

या पदोन्नतीमुळे संबंधित अधिकारी अधिक व्यापक कार्यक्षेत्रात, राज्याच्या वित्तीय व्यवस्थापनात आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत महत्त्वाची जबाबदारी निभावतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद, ठाणे यांनी तिन्ही अधिकाऱ्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत, नव्या पदावर काम करताना त्यांनी संस्थेची प्रतिष्ठा अधिक वृद्धिंगत करावी, अशा शुभेच्छा मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande