ट्रम्प यांची दहा लाख डॉलर्सची ‘ट्रम्प गोल्ड कार्ड’ योजना सुरू करण्याची घोषणा
वॉशिंग्टन, 11 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी दहा लाख डॉलर्सची ‘ट्रम्प गोल्ड कार्ड’ योजना सुरू करण्याची घोषणा केली. ट्रम्प यांनी दावा केला की त्यांची ‘ट्रम्प गोल्ड कार्ड’ योजना अमेरिकेतील कंपन्यांना अशा प्रतिभ
ट्रम्प यांची दहा लाख डॉलर्सची ‘ट्रम्प गोल्ड कार्ड’ योजना सुरू करण्याची घोषणा


वॉशिंग्टन, 11 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी दहा लाख डॉलर्सची ‘ट्रम्प गोल्ड कार्ड’ योजना सुरू करण्याची घोषणा केली. ट्रम्प यांनी दावा केला की त्यांची ‘ट्रम्प गोल्ड कार्ड’ योजना अमेरिकेतील कंपन्यांना अशा प्रतिभावान व्यक्तींना नियुक्त करण्यास आणि देशात कायम ठेवण्यास सक्षम करेल.

‘ट्रम्प गोल्ड कार्ड’ योजना ही एक व्हिसा योजना आहे, जी परदेशी नागरिकांना अमेरिकन नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग उपलब्ध करून देईल. ‘ट्रम्प गोल्ड कार्ड’ हा असा व्हिसा आहे, जो एखाद्या व्यक्तीची अमेरिकाासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्याची क्षमता पाहून दिला जाईल.

व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या एका बैठकीत ट्रम्प म्हणाले,“एखाद्या महान व्यक्तीचे आपल्या देशात येणे हे आपल्या साठी एक भेटवस्तूसारखे आहे. कारण अनेक विलक्षण लोकांना येथे राहण्याची परवानगी मिळत नाही. कॉलेजमधून पदवी मिळाल्यानंतर त्यांना भारतात परत जावे लागते, चीनमध्ये परत जावे लागते, फ्रान्समध्ये परत जावे लागते. त्यांना जिथून आले तेथेच परत जावे लागते. येथे राहणे अतिशय कठीण असते. ही लज्जास्पद गोष्ट आहे. ही हास्यास्पद परिस्थिती आहे. आम्ही यावर काम करत आहोत.”

ट्रम्प यांनी सांगितले की गोल्ड कार्डची वेबसाइट सुरू झाली आहे आणि आता कंपन्या व्हार्टन, हार्वर्ड, एमआयटीसारख्या अमेरिकेतील शीर्ष विद्यापीठांतून पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातच ठेवण्यासाठी हे गोल्ड कार्ड खरेदी करू शकतात.या कार्यक्रमाला भारतीय वंशाचे आयबीएमचे अमेरिकन सीईओ अरविंद कृष्णा आणि डेल टेक्नॉलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल डेल उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande