अमरावती - अचलपूर नगरपरिषदेतून दोघांची माघार
अमरावती, 11 डिसेंबर (हिं.स.)अंजनगाव सुर्जीच्या नगराध्यक्षपदाकरिता सात तर २८ सदस्य पदाकरिता १७३ व इतर नगरपरिषदेत सदस्यांच्या सहा जागांवर ३१ अशा २११ उमेदवारांकरिता २० डिसेंबर रोजी मतदान होत आहे. याअंतर्गत आयोगाने न्यायालयाच्या आदेशाने उमेदवारांना बुध
अमरावती - अचलपूर नगरपरिषदेतून दोघांची माघार


अमरावती, 11 डिसेंबर (हिं.स.)अंजनगाव सुर्जीच्या नगराध्यक्षपदाकरिता सात तर २८ सदस्य पदाकरिता १७३ व इतर नगरपरिषदेत सदस्यांच्या सहा जागांवर ३१ अशा २११ उमेदवारांकरिता २० डिसेंबर रोजी मतदान होत आहे. याअंतर्गत आयोगाने न्यायालयाच्या आदेशाने उमेदवारांना बुधवारी नामांकन मागे घेण्याकरिता संधी देण्यात आली होती. यामध्ये अचलपूर नगरपरिषदेतून केवळ दोघांची माघार घेतली. त्यामुळे आता २० डिसेंबरला मतदान होणाऱ्या सर्व पालिकेत २०९ उमेदवार रिंगणात आहेत.

नगरपरिषदेच्या काही उमेदवारांनी न्यायालयात केलेल्या याचिकेनंतर निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगराध्यक्ष पदासह सर्वच २८ सदस्यपदाची निवडणूक १८ दिवस पूढे ढकलली. तसेच दर्यापूर, अचलपूर, वरुड, धारणी येथील सहा प्रभागातील सदस्यपदाची निवडणूक रद्द करीत सुधारीत कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यामुळे येथे आता २० डिसेंबरला मतदान व २१डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. अंजनगाव सुर्जीमध्ये एका नगराध्यक्षपदा करिता सात तर २८ सदस्यपक्षाकरिता १७३ उमेदवार रिंगणात होते. तसेच दर्यापूर येथील २ (अ) या प्रभागात ६, अचलपूर प्रभाग क्रमांक १० (अ) मध्ये ९, १९ (ब) मध्ये ८, वरुड नगरपरिषदेत प्रभाग क्रमाक १२ (अ) मध्ये २, धारणी नगरपंचायत मधील १४ मध्ये ४ आणि १६ मध्ये २ असे ३१ उमेदवार रिगणात होते. असे एकूण नगराध्यक्षपदाच्या सात उमेदवारांसह सदस्यांच्या ३४ पदांकरिता २०४ उमेदवारांचा समावेश आहे.या उमेदवारांना बुधवारी नामांकन अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आली होती. यामध्ये अचलपूर येथील दोन सदस्यांनी माघार घेतली असून इतर सदस्य जैसे थे आहेत. त्यामुळे आता अचलपूरमध्ये रिगणात असलेल्या १७ पैकी १५ उमेदवार रिंगणाम कायम आहेत. त्यामुळे सदस्य पदासाठी २०२ तर नगराध्यक्षपदासाठी सात असे २०९ उमेदवार निवडणूक लढविणार आहे. गुरुवारी या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून त्यांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर ९ दिवस प्रचाराकरिता मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande