अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या किनाऱ्याजवळ तेल टँकर केला जप्त
वॉशिंग्टन, 11 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या किनाऱ्याजवळून एक तेल-वाहतूक जहाज (टँकर) जप्त केले आहे. अमेरिकेच्या अटॉर्नी जनरल पामेला बॉन्डी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अमेरिकन सैनिक आपल्या विमानातून थेट जहाजाच्या डेकवर उतरत
अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या किनाऱ्याजवळ तेल टँकर केला जप्त


वॉशिंग्टन, 11 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या किनाऱ्याजवळून एक तेल-वाहतूक जहाज (टँकर) जप्त केले आहे. अमेरिकेच्या अटॉर्नी जनरल पामेला बॉन्डी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अमेरिकन सैनिक आपल्या विमानातून थेट जहाजाच्या डेकवर उतरतात आणि नियंत्रण कक्षात जाऊन जहाज ताब्यात घेतात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईसाठी सैनिकांचे कौतुक केले. व्हाइट हाऊसमधील एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, “आम्ही नुकतेच व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यावरून एक टँकर जप्त केला आहे. हा आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या टँकरांपैकी सर्वात मोठा टँकर आहे.” मात्र टँकरचा मालक कोण आहे, याबद्दल ट्रम्प यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. जेव्हा त्यांच्याकडे जहाजावर असलेल्या तेलाबद्दल विचारले गेले तेव्हा ते म्हणाले, “ठीक आहे, मला वाटते ते आता आमच्याचकडे आहे.”

ट्रम्प यांच्या विधानानंतर काही तासांतच अटॉर्नी जनरल पाम बॉन्डी यांनी एक्स वर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि सांगितले की सरकारने व्हेनेझुएला आणि इराणहून येणाऱ्या एका टँकरवर जप्तीचा वॉरंट लागू केला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, “आज फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन (FBI), होमलॅंड सिक्युरिटी इन्वेस्टिगेशन (HSI) आणि युनायटेड स्टेट्स कोस्ट गार्ड यांनी, संरक्षण विभागाच्या सहकार्याने, व्हेनेझुएला आणि इराणहून बंदी घातलेले तेल वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एका कच्च्या तेलाच्या टँकरची जप्ती केली.”

अनेक वर्षांपासून हा टँकर अमेरिकेद्वारे बंदी घातलेल्या बेकायदेशीर तेल-वाहतूक नेटवर्कमध्ये सहभागी असल्याचे सांगितले जाते, कारण हे नेटवर्क परदेशी दहशतवादी संघटनांना मदत करत असल्याचा आरोप आहे. अमेरिकन सैनिकांनी ही जप्ती व्हेनेझुएलाच्या किनाऱ्याजवळ केली. बंदी घातलेल्या तेलाच्या वाहतुकीला थांबवण्यासाठी होमलॅंड सिक्युरिटी विभागाची तपासणी सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande