
लातूर, 11 डिसेंबर (हिं.स.)। उदगीर–बिदर रोडवर आज रात्री एक गंभीर दुर्घटना घडली. रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या मालवाहू ट्रकला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ट्रकचा चालक स्वयंपाक करत असताना गॅसचा स्फोट झाला आणि काही सेकंदांतच आगीने ट्रकला वेढा घातला. स्फोटाचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही वेळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चालकाने प्रसंगावधान दाखवत ट्रकच्या बाहेर पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि अल्पावधीतच आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, आग इतकी भीषण होती की ट्रकमधील संपूर्ण माल जळून खाक झालेला दिसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis