महागाई वाढत असताना राज्य सरकारचे अंदाजपत्रक फसले आहे ! - भास्कर जाधव
नागपूर, 11 डिसेंबर (हिं.स.) - महाराष्ट्रातील शेतकरी अवकाळी पाऊस आणि अतीवृष्टीमुळे अडचणीत आहे. शेतकर्‍यांना साहाय्य करण्याविषयी केंद्र सरकारकडे कधी प्रस्ताव पाठवला त्यांचा दिनांक घोषित करा. पिकांच्या हानीची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पथक रातोरात येऊन
भास्कर जाधव


नागपूर, 11 डिसेंबर (हिं.स.) - महाराष्ट्रातील शेतकरी अवकाळी पाऊस आणि अतीवृष्टीमुळे अडचणीत आहे. शेतकर्‍यांना साहाय्य करण्याविषयी केंद्र सरकारकडे कधी प्रस्ताव पाठवला त्यांचा दिनांक घोषित करा. पिकांच्या हानीची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पथक रातोरात येऊन गेले. महाराष्ट्रातील शेतकर्‍याला आवश्यकता आहे; मात्र बिहार निवडणुकांमुळे तेथे कोणतीच आपत्ती नसतांना १०-१० हजार रुपये मतदारांच्या खात्यात पाठवले होते. राज्यात महागाई वाढली असून शेतकरी खचला आहे. राज्य सरकारचे अंदाजपत्रक फसले आहे, असा घणाघात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांनी विधानसभेत केला.

विधानसभा नियम २९३ अंतर्गत शेतकरी समस्यांसंदर्भात सभागृहाची ‘विशेष बैठक’ सकाळी ९.४५ वाजता आयोजित केली होती. या चर्चेचा प्रारंभ सत्तारूढ पक्षाचे आमदार रणधीर सावरकर यांनी केला. भास्कर जाधव म्हणाले की, सरकारने घोषित केलेले ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज कसे वितरित करणार आहे, ते घोषित करावे. वारंवार पुरवणी मागण्या करता, गोळा बेरीज म्हणजे पॅकेज नव्हे. कोकणातील शेती आणि समस्या मांडताना हापूस आंब्याचे मानांकन बलसाड आंब्याला देण्यास त्यांनी कडाडून विरोध केला. त्या आंब्याला ‘हापूस’ शब्द नको ती कोकणची देन आहे असे त्यांनी सांगितले.

सत्तारूढ पक्षाचे सदस्य रणधीर सावरकर यांनी सरकारला घरचा आहेर देताना सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती एकच आहे हे घोषित करा, अशी मागणी केली. कृषी विद्यापिठात राजकीय स्थानांतरांचे अधिकारी नकोत, तर बुद्धिमान अधिकारी पाठवा. महाराष्ट्र रिसर्च मिशन रहित करा, कृषी विद्यापिठांना सशक्त करा, तसेच कृषिमंत्र्यांनी या संदर्भात ‘विशेष बैठक’ घ्यावी, अशी मागणी सावरकर यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande