पाकिस्तानच्या माजी आयएसआय प्रमुखांना सुनावण्यात आली १४ वर्षांची शिक्षा
इस्लामाबाद , 11 डिसेंबर (हिं.स.)।पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय)चे माजी महासंचालक लेफ्टनंट जनरल (निवृत्त) फैज हमीद यांचे कोर्ट मार्शल झाले आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय मानले जाणारे फैज ह
पाकिस्तानच्या माजी आयएसआय प्रमुखांना सुनावण्यात आली १४ वर्षांची शिक्षा


इस्लामाबाद , 11 डिसेंबर (हिं.स.)।पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय)चे माजी महासंचालक लेफ्टनंट जनरल (निवृत्त) फैज हमीद यांचे कोर्ट मार्शल झाले आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय मानले जाणारे फैज हमीद यांना सीक्रेट ऍक्टचे उल्लंघन केल्याबद्दल 14 वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आयएसआयचे प्रमुख राहिलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याचा कोर्ट मार्शल हा पहिलाच प्रसंग आहे. इम्रान खान यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांना जनरल आसिम मुनीर यांचे सध्याचे सत्तातंत्र आवडत नाही, असे मानले जाते.

पाकिस्तान सैन्याने गुरुवार (11 डिसेंबर) रोजी जारी केलेल्या निवेदनात सांगितले की फैज हमीद यांच्यावर पद व अधिकारांचा दुरुपयोग, देशाच्या गुप्त कागदपत्रांचे उल्लंघन इत्यादी गंभीर आरोप लावले गेले. याशिवाय, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात 2023 मध्ये सादर झालेल्या दस्तऐवजांनुसार, फैज हमीद यांच्यावर एका खासगी रिअल इस्टेट डेव्हलपरच्या व्यावसायिक ठिकाणी छापे मारल्याचेही आरोप आहेत. या सर्व गुन्ह्यांसाठी त्यांना 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या सैन्य जनसंपर्क विभाग (आयएसपीआर)ने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे,“फैज हमीद यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान, तथा सध्या तुरुंगात असलेले इम्रान खान यांच्या कार्यकाळात सेवा बजावली होती. त्यांच्या विरोधात राजकीय कारवायांमध्ये सहभागी होणे आणि लोकांना अनुचित नुकसान पोहोचवणे यांसारख्या आरोपांमध्ये दोष सिद्ध झाला आहे.”

आयएसपीआर ने पुढे सांगितले, “दिर्घ आणि गुंतागुंतीच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर आरोपी सर्व आरोपांमध्ये दोषी ठरले आहेत आणि गुरुवारी (11 डिसेंबर) घोषित केलेल्या आदेशानुसार त्यांना 14 वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande