संसद हल्ल्यातील शहीदांना राष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
नवी दिल्ली, १३ डिसेंबर (हिं.स.) संसद भवनावरील दहशतवादी हल्ल्याच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी शूर शहीदांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांचे आद
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, १३ डिसेंबर (हिं.स.) संसद भवनावरील दहशतवादी हल्ल्याच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी शूर शहीदांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांचे आदरपूर्वक स्मरण केले.

१३ डिसेंबर २००१ रोजी जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या पाच दहशतवाद्यांनी संसद भवनावर हल्ला केला, परंतु भारतीय सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आपले प्राण धोक्यात घालून त्यांचे मनसुबे उधळून लावलेच, तर त्या सर्वांना ठार मारले. दिल्ली पोलिसांच्या पाच कर्मचाऱ्यांनी, एका महिला कॉन्स्टेबलने आणि दोन सुरक्षा रक्षकांनी अंतिम बलिदान दिले.

या शहीदांना आठवून राष्ट्रपती म्हणाल्या, २००१ मध्ये या दिवशी आपल्या संसदेचे रक्षण करताना आपले प्राण अर्पण करणाऱ्या शूर वीरांना राष्ट्र सलाम करते. त्यांचे शौर्य आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आपल्या राष्ट्रीय भावनेला प्रेरणा देत राहील. राष्ट्र त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कायमचे ऋणी राहील. या दिवशी, आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो.

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात आपले प्राण अर्पण करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या दिवशी आपला देश २००१ मध्ये आपल्या संसदेवर झालेल्या भीषण हल्ल्यात प्राण गमावलेल्या वीरांचे स्मरण करतो. गंभीर धोक्याच्या प्रसंगी त्यांचे धैर्य, सतर्कता आणि अतूट कर्तव्यनिष्ठा वाखाणण्यासारखी होती. त्यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल भारत सदैव कृतज्ञ राहील.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, संसद भवनावरील भ्याड दहशतवादी हल्ल्यात अतूट ढाल म्हणून उभे राहिलेल्या शूर सुरक्षा कर्मचाऱ्यांना आम्ही मनापासून श्रद्धांजली वाहतो. त्यांनी आपल्या लोकशाहीच्या आत्म्याचे रक्षण करण्यासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांचे धैर्य, सर्वोच्च बलिदान आणि कर्तव्याची अटळ भावना नेहमीच राष्ट्राच्या चेतनेत जिवंत राहील आणि भारताच्या संकल्पाला प्रेरणा देईल.

गृहमंत्री अमित शहा म्हणाले, आजचा दिवस हा दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आपल्या सुरक्षा दलांच्या अदम्य धैर्याचे आणि पराक्रमाचे पुन्हा एकदा स्मरण करण्याचा दिवस आहे. २००१ मध्ये, त्यांच्या दृढनिश्चयाने आणि आत्म्याने, त्यांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे मंदिर असलेल्या आपल्या संसद भवनावर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला उधळून लावला. दहशतवाद्यांना योग्य उत्तर देताना शहीद झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या शूर योद्ध्यांच्या बलिदानाचे आणि हौतात्म्याचे हे राष्ट्र नेहमीच ऋणी राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande