भोंसला संस्थेच्या अध्यक्षपदी एअर चिफ मार्शल (नि.) विवेक राम चौधरी यांची निवड
नाशिक, 13 डिसेंबर (हिं.स.)। - सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी आज एअर चिफ मार्शल (निवृत्त) विवेक राम चौधरी (पीव्हीएसएम,एव्हीएसएम,व्हीएम) यांची कार्यकारीणीच्या सभेत एकमताने निवड करण्यात आली. कार्यकारीणीची सभा झाली, अशी माहिती
सीएचएमई(भोंसला) संस्थेच्या अध्यक्षपदी विवेक राम चौधरी यांची निवड


नाशिक, 13 डिसेंबर (हिं.स.)।

- सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी आज एअर चिफ मार्शल (निवृत्त) विवेक राम चौधरी (पीव्हीएसएम,एव्हीएसएम,व्हीएम) यांची कार्यकारीणीच्या सभेत एकमताने निवड करण्यात आली. कार्यकारीणीची सभा झाली, अशी माहिती संस्थेचे सरकार्यवाह हेमंत देशपांडे यांनी दिली. दूरदृष्टी असलेल्या या अनुभवी व नव्या अधिकाऱ्यांमुळे संस्थेच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

संस्थेचे विद्यमान अध्यक्ष लेप्टनंट जनरल डॉ.डी.बी.शेकटकर(निवृत्त) यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवृत्ती स्विकारली आहे. एअर चिफ मार्शल (निवृत्त) विवेक राम चौधरी हे भारतीय वायुसेनेतील अत्यंत अनुभवी आणि सन्माननीय नेतृत्व, व्यक्तिमत्त्व आहेत. भारतीय वायुसेनेमध्ये जवळपास 42 वर्षांचा सेवा प्रवास त्यांनी पूर्ण केला. ज्यांनी प्रमुख ऑपरेशनल, कमांड व प्रशासनिक भूमिका साकारल्या व भारताच्या हवाई सामर्थ्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.त्याच्या उत्तम नेतृत्वाबद्दल त्यांना त्यांच्या सेवेसाठी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यात विशेष सेवा,अति विशेष सेवा आणि वायुसेना पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. 29 डिसेंबर 1982 रोजी फाइटर स्ट्रीममध्ये त्यांचे कमीशन झाले. विविध फाइटर व ट्रेनर विमानांवर 3,800 हुन अधिक तासांचे उड्डाणाचा त्यांना अनुभव आहे. ऑपरेशन मेघदूत, सफेद सागर सारख्या महत्त्वाच्या ऑपरेशन्समध्ये त्यांचा विशेष सहभाग राहिला आहे. त्यांनी फ्रंटलाइन फाइटर स्क्वाड्रन आणि महत्त्वाच्या एअर बेसचे नेतृत्व केले आहे.

विविध पदांवर समर्थपणे सांभाळली जबाबदारी

चिफ ऑफ द एअर स्टाफ (CAS) 27वे वायुसेना प्रमुख (30 सप्टेंबर 2021 – 30 सप्टेंबर 2024) या कालावधीत त्यांनी काम पाहिले. व्हाइस चिफ ऑफ एअर स्टॉफ या अगोदरच्या टर्ममध्ये त्यांनी हे महत्त्वाचे पद भूषवले होते. एअर ऑफिसर कमांडींग इन चिफ वेस्टर्न एअर कमांड या वेस्टर्न एअर कमांडचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी विविध कमांड व स्टाफ भूमिका पार पाडल्या. जसे की डिप्टी चीफ ऑफ एयर स्टाफ, सीनियर एयर स्टाफ ऑफिसर (ईस्टर्न एयर कमांड) आणि इतर महत्त्वाच्या प्रशासनिक आणि ऑपरेशनल पदांवरील कामाचा त्यांना अनुभव आहे. त्यांना दोन मुले असून (त्यातील एक रफाल पायलट स्क्वार्डन लिडर ते होते.) त्याच्या या विविध पदांवरील अनुभवांचा संस्थेच्या वाटचालीसाठी निश्चित खूप मोठा उपयोग भविष्यात होणार आहे, अशी आशा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande