हीरो विडाची मुलांसाठी पहिली इलेक्ट्रिक ऑफ-रोड बाइक लाँच
मुंबई, 14 डिसेंबर (हिं.स.)। इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी हीरो विडाने आपल्या पहिल्या ऑफ-रोड इलेक्ट्रिक मोटरसायकल विदा डर्ट.ई के3 चे अधिकृत लाँच केले आहे. ही मोटरसायकल खास 4 ते 10 वयोगटातील तरुण राइडर्ससाठी डिझाइन करण्यात आली असून, मोठ्या आणि जास्त
Hero Vida Launches First Electric


Hero Vida Launches First Electric


मुंबई, 14 डिसेंबर (हिं.स.)। इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी हीरो विडाने आपल्या पहिल्या ऑफ-रोड इलेक्ट्रिक मोटरसायकल विदा डर्ट.ई के3 चे अधिकृत लाँच केले आहे. ही मोटरसायकल खास 4 ते 10 वयोगटातील तरुण राइडर्ससाठी डिझाइन करण्यात आली असून, मोठ्या आणि जास्त शक्तिशाली बाइक्सकडे जाण्यापूर्वी मुलांना सुरक्षित, आत्मविश्वासपूर्ण आणि कौशल्यवर्धक मोटरसायकलिंगचा अनुभव देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

विदा डर्ट.ई के3 मध्ये थ्री-पोजिशन अ‍ॅडजस्टमेंट मेकॅनिझम देण्यात आला आहे. फक्त एका एलन-कीच्या मदतीने ही बाइक छोट्या, मध्यम आणि मोठ्या साइजमध्ये अ‍ॅडजस्ट करता येते. या प्रणालीमुळे सीटची उंची आणि व्हीलबेस दोन्ही बदलता येतात, त्यामुळे ही मोटरसायकल मुलांच्या वाढीनुसार काही वर्षे वापरण्यास योग्य ठरते आणि लवकर छोटी पडत नाही. कंपनीने असेही सांगितले आहे की जेव्हा मुलांचा स्किल लेव्हल वाढतो आणि फ्रंट व रिअर सस्पेन्शनची गरज भासते, तेव्हा ती ऑप्शनल अ‍ॅक्सेसरीज म्हणून खरेदी करता येतील.

या इलेक्ट्रिक ऑफ-रोड बाइकमध्ये 500W क्षमतेची मोटर देण्यात आली असून ती 23 ते 25 किमी प्रतितास इतक्या टॉप स्पीडपर्यंत जाऊ शकते. रिमूवेबल बॅटरीला 0 ते 100 टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे तीन तास लागतात आणि वापराच्या पद्धतीनुसार ही बॅटरी सुमारे तीन तास चालू शकते. विदा डर्ट.ई के3 मध्ये बिगिनर, अमेच्योर आणि प्रो असे तीन राइड मोड देण्यात आले असून, त्यानुसार स्पीड 8, 16 आणि 25 किमी प्रतितास इतका मर्यादित ठेवण्यात येतो.

मुलांच्या सुरक्षेचा विचार करून या मोटरसायकलमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत. यामध्ये मजबूत वायरिंग, लहान हातांसाठी खास डिझाइन केलेले ब्रेक लीव्हर्स, इम्पॅक्ट होण्याची शक्यता असलेल्या भागांमध्ये एनर्जी-एब्जॉर्बिंग मटेरियल आणि राइडर पडल्यास मोटर बंद करणारा इमर्जन्सी कटऑफ टेदर यांचा समावेश आहे. पालकांसाठी एक खास अ‍ॅपही देण्यात आले असून, त्याद्वारे ते स्पीड लिमिट सेट करू शकतात, काही राइड मोड लॉक करू शकतात आणि मुलांच्या राइडिंग सेशनवर लक्ष ठेवू शकतात.

विदा डर्ट.ई के3 ची सुरुवातीची किंमत 69,990 रुपये ठेवण्यात आली आहे. ही मोटरसायकल आंध्र प्रदेशातील विडाच्या तिरुपती येथील प्लांटमध्ये तयार केली जाणार असून, पहिल्या टप्प्यात दिल्ली, बेंगळुरू, पुणे, जयपूर आणि कालीकट या शहरांमध्ये डिलिव्हरी सुरू केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande