अमरावतीत घरफोडी व मंदिर चोरी प्रकरणातील दोघे ताब्यात
अमरावती, 17 डिसेंबर (हिं.स.) अमरावती शहरातील वाढत्या घरफोडी व मंदिर चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी अमरावती शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या अटकेमुळे शहरातील एकूण तीन गंभीर गुन्हे
घरफोडी व मंदिर चोरी करणारे रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार गजाआड अमरावती शहर गुन्हे शाखेची कारवाई; तीन गुन्हे उघडकीस, ४७,७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त


अमरावती, 17 डिसेंबर (हिं.स.)

अमरावती शहरातील वाढत्या घरफोडी व मंदिर चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी अमरावती शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या अटकेमुळे शहरातील एकूण तीन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून चोरीचा एकूण ४७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी अमरावती शहरातील घरफोडी व मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत स्पष्ट आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, गुन्हे शाखा अमरावती शहर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला.

पोलीस ठाणे बडनेरा येथे दाखल अप.क. ६५३/२०२५, कलम ३०५ (ड) भा.न्या.सं. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी हे पुन्हा चोरीच्या उद्देशाने बडनेरा रेल्वे स्टेशन परिसरात फिरत आहेत.मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून १) प्रधानसिंग बख्तावरसिंग शिकलीकर (४५) व २) जकपालसिंग जगदिशसिंग शिकलीकर (२०), दोन्ही रा. नंदुरबार या दोन आरोपींना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी अमरावती शहरात घरफोडी व मंदिर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.तपासात आरोपींकडून पोलीस ठाणे बडनेरा येथील दोन व पोलीस ठाणे राजापेठ येथील एक असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून चोरीचे रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण ४७,७५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, पोलीस उपायुक्त (मुख्यालय व गुन्हे) रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले व पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande