अकोल्यात दोन दिवसीय पुष्प प्रदर्शनीचे आयोजन
अकोला, 18 डिसेंबर, (हिं.स.)।दिनांक 20 व 21 डिसेंबर ला दोन दिवसीय पुष्पप्रदर्शन अकोल्यातील गोरक्षण रोडवरील शुभमंगल कार्यालयात सर्वांकरीता खुले असून, अकोला गार्डन क्लब व महाबीज च्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. निसर्गप्रमी
P


अकोला, 18 डिसेंबर, (हिं.स.)।दिनांक 20 व 21 डिसेंबर ला दोन दिवसीय पुष्पप्रदर्शन अकोल्यातील गोरक्षण रोडवरील शुभमंगल कार्यालयात सर्वांकरीता खुले असून, अकोला गार्डन क्लब व महाबीज च्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. निसर्गप्रमी व पुष्प प्रेमी नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन अकोला गार्डन क्लबचे अध्यक्ष संजय शर्मा यांनी केलं आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अकोला गार्डन क्लब ही संस्था मागील 51 वर्षापासून पुष्पप्रदर्शनाचे भव्य दिव्य असे आयोजन करत असते. यंदा या संस्थेचं हे 52 वे वर्ष असून, इथे 1000 पेक्षा जास्त फुल व झाडांच्या जाती व प्रकार अकोलेकरांना बघायला मिळणार आहे. सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत सर्वांसाठी हे प्रदर्शन सुरू असेल. शालेय विद्यार्थी सुद्धा या प्रदर्शनीला भेट देऊ शकतात. यंदाच्या प्रदर्शनात महिला व मुलांकरता विविध गेम शो चे सुद्धा आयोजन गार्डन क्लबच्या महिला विंग तर्फे कारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे फूड स्टॉल सुद्धा तिथे उपलब्ध असतील, तसेच घरगुती गार्डन करिता लागणाऱ्या साहित्याचे व शोभिवंत फुलझडाचे स्टॉल विक्रीकरिता तिथे उपलब्ध असतील. अशी माहिती गार्डन क्लब तर्फे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जेष्ठ पर्यावरण तज्ञ शरद कोकाटे यांनी दिली.

गुलाब व शेवंती शिवाय इतरही नवनवीन फुल यंदाच्या प्रदर्शनीचे आकर्षण असणार आहे. सोबतच विविध प्रकारचे बोन्साय व आकर्षक झाड सुद्धा बघायला मिळतील. गुलाबांच्या फुलांच्या विविध रंगबिरंगी छटा या प्रदर्शनीत अकोलेकरांना बघायला मिळतील. याशिवाय औषधी गुणधर्म असणाऱ्या झाडांचे सुद्धा एक विशेष दालन इथे उपलब्ध असेल.

२० डिसेंबरला सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते प्रदर्शनीचे उद्घाटन होणार असून, प्रमुख उपस्थिती म्हणून महाबीज च्या व्यवस्थापकीय संचालक एस. भुवनेश्वरी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर हे प्रदर्शन नागरिकांसाठी सुरू असणार आहे. अकोलेकरांनी या पुष्प प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन गार्डन क्लबचे सचिव श्याम गोटफोडे, माजी अध्यक्ष अजय सेंगर व अकोला गार्डन क्लबच्या इतर पदाधिकाऱ्यांनी केलं आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande