
चंद्रपूर, 18 डिसेंबर (हिं.स.)।
मोहर्ली वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या हल्ल्यात मजुराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी वाजता घडली.
साहजू चमरू बिलठेरिया (६३) हा मजूर मोहर्ली वनपरिक्षेत्रातील पद्मापूर नियतक्षेत्राच्या अडेगाव गावालगत कक्ष क्रमांक १८१ मध्ये बांबू कटाईचे कामे करीत होता. त्यावेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून त्याला जागीच ठार केल्याची घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभाग व पोलीस विभागाचे अधिकारी- कर्मचारी तातडीने दाखल झाले. मृत मजुराचे नातेवाईकांना घटनास्थळीच तात्काळ मदत म्हणून ५० हजार रुपयांची रक्कम देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव