रत्नागिरी : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद दौरा
रत्नागिरी, 18 डिसेंबर, (हिं. स.) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना नेते व माजी खासदार विनायक राऊत आणि गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच
चिपळूण शिवसेना ठाकरे गट कार्यकर्ता मेळावा


रत्नागिरी, 18 डिसेंबर, (हिं. स.) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना नेते व माजी खासदार विनायक राऊत आणि गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यात दोन दिवसांचा कार्यकर्ता संवाद दौरा पार पडला.

या दौऱ्यात जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम आणि चिपळूण विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांशी संवाद साधण्यात आला. आगामी निवडणुकांमध्ये ग्रामीण व तालुकास्तरावरील राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या या निवडणुकांसाठी शिवसेनेने संघटनात्मक तयारीला वेग दिल्याचे चित्र या संवादातून स्पष्ट झाले.

दोन दिवसांत कळवंडे, खेर्डी, सावर्डे, कोकरे, अलोरे, पेढे व शिरगाव जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये बैठका घेण्यात आल्या. निवडणूक रणनीती, संघटनात्मक मजबुती आणि स्थानिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या दौऱ्यात विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव ऊर्फ बाळा कदम, तालुका प्रमुख बळीराम गुजर, तालुका समन्वयक सुधीर भाऊ शिंदे, शहर प्रमुख सचिन ऊर्फ भैया कदम, महिला व युवासेना पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande