चांदीने 2 लाखाचा टप्पा ओलांडला
जळगाव , 18 डिसेंबर (हिं.स.)आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावात चढउतार होताना पाहायला मिळत असून जळगावच्या सराफ बाजारात बुधवारी एकाच दिवसात तब्बल ७ हजाराहून अधिकची वाढ झाल्यानं चांदीने तब्बल २ लाख रुपयाचा टप्पा
संग्रहित लोगो


जळगाव , 18 डिसेंबर (हिं.स.)आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावात चढउतार होताना पाहायला मिळत असून जळगावच्या सराफ बाजारात बुधवारी एकाच दिवसात तब्बल ७ हजाराहून अधिकची वाढ झाल्यानं चांदीने तब्बल २ लाख रुपयाचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे चांदीने आजपर्यंत ऐतिहासिक उच्चांक गाठला असून यामुळे ग्राहकांसह सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.जळगाव सराफ बाजारात दिवसभरात चांदी ७२१० रुपयांनी वाढून २,०७,५४५ रुपये किलोवर स्थिरावली. हा चांदीचा नवा सर्वकालीन उच्चांक ठरला तर सोनेही ६१८ रुपयांनी वाढून १,३६,५७८ रुपये तोळ्यावर पोहोचले आहे.अवघ्या १६ दिवसात चांदी २९,६३० रुपयांनी महागली आहे. १ डिसेंबरला चांदी १,७९,२२० रुपये होती. बुधवारी ती विक्रमी २,०७,५४५ रु. दरावर पोहचली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande