बीड - महसूल कर्मचाऱ्यांचे शुक्रवारपासून काम बंद आंदोलन
बीड, 18 डिसेंबर (हिं.स.)। आपल्या प्रलंबित मागण्यासाठी बीड जिल्ह्यातील महसूल अधिकारी आणि कर्मचारी शुक्रवारपासून काम बंद आंदोलन करणार आहेत. राज्यातील महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अन्यायकारक निलंबन कारवाई, प्रलंबित मागण्या आणि कामाच्या वाढत्या तण
बीड - महसूल कर्मचाऱ्यांचे शुक्रवारपासून काम बंद आंदोलन


बीड, 18 डिसेंबर (हिं.स.)।

आपल्या प्रलंबित मागण्यासाठी बीड जिल्ह्यातील महसूल अधिकारी आणि कर्मचारी शुक्रवारपासून काम बंद आंदोलन करणार आहेत.

राज्यातील महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अन्यायकारक निलंबन कारवाई, प्रलंबित मागण्या आणि कामाच्या वाढत्या तणावाविरोधात एल्गार पुकारला आहे. महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघाने १९ डिसेंबर २०२५ पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना देण्यात आले

बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन, वाहतूक आणि चोरी रोखण्याची जबाबदारी महसूल विभागासोबतच पोलीस आणि - परिवहन विभागाचीही आहे. तरीही सर्व दोष - महसूल कर्मचाऱ्यांवर टाकले जात आहेत. न्यायालयीन निर्देश, नैसर्गिक न्याय आणि - प्रशासकीय नियम डावलून एकतर्फी निलंबने केली जात असल्याचा आरोप करण्यातआला. १२ आणि १३ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या निलंबन आदेशांचा पुनर्विचार करून ते रद्द करावेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत कर्मचाऱ्यांना पूर्ववत पदावर ठेवावे. नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि महसूल सहाय्यक यांच्या वेतनश्रेणी आणि ग्रेड पे सुधाराव्यात. महसूल सेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर कराव्यात. निवडणूक आणि आपत्ती काळातील कामासाठी संरक्षणात्मक धोरण १० लागू करावे. अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देताना अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, उपजिल्हाधिकारी मनोज घोडे, कविता जाधव, शिवकुमार स्वामी, प्रभोदय मुळे, शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार चंद्रकांत शेळके, डी. सी. मेंडके, नरेंद्र कुलकर्णी, विनोद रणनवरे, विलास तरंगे, राकेश गिड्ढे, नायब तहसीलदार जाधवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande