जलताराला तंत्रज्ञानाची जोड ; जिओ-फेन्सिंगद्वारे पारदर्शक अंमलबजावणी
नांदेड, 18 डिसेंबर (हिं.स.)। उपक्रम अधिक परिणामकारक, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी जलतारा उपक्रमाला तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. प्रत्येक कामाची जिओ-फेन्सिंगद्वारे नोंद, छायाचित्रण तसेच प्रत्यक्ष प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र मोबाईल
नांदेड


नांदेड, 18 डिसेंबर (हिं.स.)।

उपक्रम अधिक परिणामकारक, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी जलतारा उपक्रमाला तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. प्रत्येक कामाची जिओ-फेन्सिंगद्वारे नोंद, छायाचित्रण तसेच प्रत्यक्ष प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. या जलतारा अॅपचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रणालीमुळे कामांमध्ये पारदर्शकता वाढून वेळेत व दर्जेदार अंमलबजावणी सुनिश्चित होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘जलतारा ॲप’ अंमलबजावणी विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, उपजिल्हाधिकारी संजीव मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, नायब तहसीलदार जयशंकर इटकापल्ले, सर्व तालुका कृषी अधिकारी, सर्व बीडीओ, नोडल अधिकारी चेतन जाधव, एमआयएस समन्वयक रूपेश झंवर, राज्य उपजीविका तज्ज्ञ श्रीमती चेतना लाटकर, प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, सर्व एपीओ, पीटीओ, सीडीईओ तसेच एचआयएमडब्ल्यूपी सीएसओ टीमचे प्रतिनिधी व संपूर्ण जिल्हा नरेगा टीम मोठ्या संख्येने उपस्थित होती.

सर्व अधिकाऱ्यांना ‘जलतारा ॲप’ आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्याचा सक्रिय वापर करण्याचे तसेच इतरांना या उपक्रमासाठी प्रेरित करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. केवळ प्रशासकीय अंमलबजावणीपुरते मर्यादित न राहता, प्रत्येक अधिकाऱ्यांनी स्वतःच्या घरात जलतारा उभारून समाजास आदर्श घालून द्यावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande