पक्ष सोडलेल्या लोकांची अवस्था होते हे जनतेने पाहिले आहे - शालिनी ठाकरे
डोंबिवली, 18 डिसेंबर (हिं.स.) कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वजनदार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला राम राम केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, माजी नगरसेविका सरोज भोईर, कल्याण शहर अध्यक्ष
Photo 1


डोंबिवली, 18 डिसेंबर (हिं.स.)

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वजनदार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला राम राम केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातून कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, माजी नगरसेविका सरोज भोईर, कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई व माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेशही केला. त्या विषयी भाष्य करताना मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी अशा पक्षबदलुवर समाचार घेतांना म्हटलं पक्षात मोठ मोठी पद मिळावायची पण नंतर पक्ष सोडून गेलेल्या अशा पदाधिकाऱ्यांचे नंतर काय परिस्थिती होते असा टोला लगावला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेत्या शालिनी ठाकरे यांनी गुरुवारी मनसेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेत महिला पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद साधण्यासाठी आल्या होत्या.

शालिनी ठाकरे यांना कल्याण डोंबिवली शहरातील पक्ष संघटनात्मक बदल तसेच डोंबिवली महिला शहरअध्यक्षा पदावरून मंदा पाटील यांना हटविण्याबाबत सांगितले की, अद्याप मंदा पाटील यांनी पक्ष सोडला नाही. परंतु संघटनात्मक बदल करण्याचे अधिकारी पक्ष प्रमुखांचा आहे. पक्षश्रेष्ठीनी विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. मंदा पाटील यांच्यावर कोणताही अन्याय झाला नाही. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे.

तर भाजपा व शिंदेंची शिवसेना पक्षाबाबत त्या म्हणाल्या हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. त्यांनी काय करावे हा त्याचा प्रश्न आहे. मनसेची कोणाबरोबर युती होणार आहे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेच ठरवतील. परंतु दोन भाऊ एकत्र आले तर ताकद वाढेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढवावि अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. पण अजूनपर्यंत काहीच ठरलं नाही.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande