खुल्या समुद्र जलतरण स्पर्धेत परळीच्या जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी
बीड, 18 डिसेंबर (हिं.स.)। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे पार पडलेल्या १५ व्या खुल्या समुद्र जलतरण स्पर्धेत परळीच्या जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी केली. सिंधुदुर्ग जलतरण संघटना व महाराष्ट्र जलतरण संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा झाली. एक
खुल्या समुद्र जलतरण स्पर्धेत परळीच्या जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी


बीड, 18 डिसेंबर (हिं.स.)। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे पार पडलेल्या १५ व्या खुल्या समुद्र जलतरण स्पर्धेत परळीच्या जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी केली. सिंधुदुर्ग जलतरण संघटना व महाराष्ट्र जलतरण संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा झाली.

एक किलोमीटर खुल्या समुद्र जलतरण स्पर्धेत दिव्यांग आभा गणेश मुंडे हिने दुसरा क्रमांक पटकावला. स्वरा लक्ष्मीकांत चाटे हिने तिसरा क्रमांक मिळवला. स्वरा हिची ही पहिलीच स्पर्धा होती. पहिल्याच प्रयत्नात तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली. समुद्रातील लाटा आणि कठीण परिस्थितीत या दोघींनी दाखवलेली जिद्द आणि आत्मविश्वास प्रेक्षक व प्रशिक्षकांच्या कौतुकास पात्र ठरला. दोन किलोमीटर फिन्स जलतरण स्पर्धेत समीक्षा वैजनाथ वेरूळे हिने पाचवा क्रमांक मिळवला. राजनंदनी प्रकाश चाटे हिने सहावा क्रमांक पटकावला. दोन किलोमीटर खुल्या जलतरण स्पर्धेत आर्या वैजनाथ वेरूळे आणि सिद्धी लक्ष्मीकांत चाटे यांनी यशस्वी कामगिरी केली. एक किलोमीटर खुल्या समुद्र जलतरण स्पर्धेत आराध्या वैजनाथ चाटे हिने घडाडीने स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेत बीड जिल्ह्यातून सात मुलींनी सहभाग घेतला. मर्यादित साधनसंपत्ती असूनही या जलतरणपटूंनी दाखवलेली मेहनत आणि चिकाटी बीडच्या क्रीडा संस्कृतीसाठी अभिमानास्पद ठरली.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande