अमरावतीत राज्यस्तरीय शालेय आर्चरी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करतात. नैसर्गिक क्रीडा कौशल्य असूनही अत्याधुनिक साहित्याअभावी खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कमी पडतात. यासाठी जिल्हा वार्षिक यो
राज्यस्तरीय शालेय आर्चरी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध करून देणार -जिल्हाधिकारी आशिष येरेकर


अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करतात. नैसर्गिक क्रीडा कौशल्य असूनही अत्याधुनिक साहित्याअभावी खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कमी पडतात. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील नाविण्यपूर्ण योजनेतून किमान 10 ते 15 आंतरराष्ट्रीय खेळाडूंना 50 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर दिली. राज्यस्तरीय शालेय आर्चरी क्रीडा स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथील आंतरराष्ट्रीय आर्चरी रेंजवर दि. 18 ते 20 डिसेंबर 2025 या दरम्यान होत आहे. आज या स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. यावेळी राज्य धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रशांत देशपांडे, सचिव प्रमोद चांदूरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, अनिल इंगळे, आदी उपस्थित होते. श्री. येरेकर यांनी, प्रतिभा असलेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय आणि ऑलिंपिक स्पर्धेकरीता आवश्यक असलेले साहित्य उपलबध झाल्यास जिल्ह्यातील खेळाडू यात सहभागी होण्यास मदत होईल. खेळाडूंनी सकारात्मक विचार करुन जीवनामध्ये यशाचे शिखर गाठावे, असे आवाहन केले. तसेच स्पर्धेचे रितसर उद्घाटन केले. राज्यस्तरीय 18 व 19 वर्ष मुले आणि मुली शालेय आर्चरी क्रीडा स्पर्धेत सन 2025-26 मध्ये राज्यातील 8 ही विभाग आणि एका क्रीडा प्रबोधिनीतील 485 मुले व मुली खेळाडू, पंच, सामनाधिकारी, निवड समिती सदस्य व संघ व्यवस्थापक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या राज्यस्तरीय शालेय आर्चरी स्पर्धेचे मुले व मुली या वयोगटातील सर्व सामने जिल्हा क्रीडा संकुलातील खेलो इंडिया आंतरराष्ट्रीय आर्चरी रेंजवर सुरु झाले आहे. दि. 18 डिसेंबर 2025 रोजी धनुर्विद्या प्रकारामधील इंडियन राऊंडची स्पर्धा झाली. दि. 19 डिसेंबर 2025 रोजी कंपाऊंड राऊंड, दि. 20 डिसेंबर 2025 रोजी रिकर्व्ह राऊंडचे सामने होणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमात सुरवातीला जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहन व क्रीडा ज्योत प्रज्वलन करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा अधिकारी अनिल इंगळे यांनी आभार मानले. -------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande