अमरावती : काँग्रेस भवनात मुलाखतीदरम्यान जोरदार शक्तीप्रदर्शन
अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.) :महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले असून उमेदवार निवडीसाठी इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. अमरावती शहरात भाजपच्या मुलाखतीनंतर आता अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या
काँग्रेस भवन येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान जोरदार शक्तीप्रदर्शन  ‘वारे पंजा आया रे पंजा’ समर्थकांच्या घोषणांनी परिसर दणाणला


अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.) :महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले असून उमेदवार निवडीसाठी इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. अमरावती शहरात भाजपच्या मुलाखतीनंतर आता अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने १८ डिसेंबरपासून काँग्रेस भवन येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात करण्यात आली आहे.या मुलाखतीदरम्यान काँग्रेस भवन परिसरात इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपली ताकद दाखवली. काँग्रेस पक्षाचे ध्वज हातात घेऊन शेकडो समर्थकांनी ‘वारे पंजा आया रे पंजा’, ‘काँग्रेस जिंदाबाद’ अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला.अमरावती शहरातील २२ प्रभागांतून काँग्रेस पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी करत मुलाखती दिल्या. प्रत्येक प्रभागातून मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित असल्याने काँग्रेस भवन येथे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.या वेळी काँग्रेस नेत्या ॲड. यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, खासदार बळवंत वानखडे, काँग्रेस प्रवक्ता दिलीप एडतकर, शहर अध्यक्ष बबलू शेखावत, प्रदेश पदाधिकारी किशोर बोरकर, भैय्या पवार, महिला काँग्रेस अध्यक्ष जयश्री वानखडे यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

अमरावतीचा महापौर काँग्रेसचाच होणारमुलाखतीदरम्यान बोलताना डॉ. सुनील देशमुख यांनी, “येत्या महानगरपालिका निवडणुकीत अमरावतीचा महापौर काँग्रेसचाच होणार,” असा ठाम विश्वास व्यक्त केला. काँग्रेस पक्ष संघटनात्मकदृष्ट्या मजबूत असून जनतेचा विश्वास पक्षासोबत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande