अंजनगावसह चार पालिकांत 6 सदस्यपदांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान
अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी नगरपरिषद व अन्य चार पालिकांमधील सहा प्रभागात ७२ मतदान केंद्रांवर २० डिसेंबरला मतदान होत आहे. यामध्ये ३२ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. त्यामुळे तेथे अतिरिक्त बंदोबस्त तैनात असेल.राज्य निवडणूक आय
अंजनगावसह चार पालिकांत 6 सदस्यपदांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान


अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी नगरपरिषद व अन्य चार पालिकांमधील सहा प्रभागात ७२ मतदान केंद्रांवर २० डिसेंबरला मतदान होत आहे. यामध्ये ३२ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. त्यामुळे तेथे अतिरिक्त बंदोबस्त तैनात असेल.राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी नगरपरिषद तसेच धारणी व अचलपूर येथे प्रत्येकी दोन सदस्य व तसेच दर्यापूर व वरुड येथे प्रत्येकी एक सदस्यपदासाठी २० डिसेंबरला ७२ केंद्रांवर मतदान होत आहे. यासाठी प्रशासनाने १५ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये तीन केंद्र तर कायदा व सुव्यवस्था तसेच आर्थिक बाबीच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी ३३ मतदान केंद्र संवेदनशील घोषित केलेले आहे. याशिवाय ६८ केंद्र परदानशीन आहेत. मतदानाच्या एक दिवसापूर्वी मतदान पथके रवाना होणार आहेत. यासाठी १५ वाहने, झोनलसाठी ११, तर सर्वेक्षण पथकासाठी ११ वाहने लागणार आहेत. पोलिस विभागाद्वारा विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक ३४६ कारवाया केल्या, तर सात प्रकरणात तडीपार करण्यात आले आहे. ५४०८ समन्स तामिल झाले. तर अवैध दारूविक्रीच्या २५९ कारवाया करण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande