पिंपरी मनपा वाढत्या प्रदूषणामागील कारणे शोधणार
पुणे, 18 डिसेंबर (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या हवा प्रदूषणाचा महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून अभ्यास केला जाणार आहे. शहरातील हवा प्रदूषणाची कारणे शोधण्यासाठी आणि उपाययोजना सुचविण्यासाठी एका अभ्यासक संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या
पिंपरी मनपा वाढत्या प्रदूषणामागील कारणे शोधणार


पुणे, 18 डिसेंबर (हिं.स.)।

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या हवा प्रदूषणाचा महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून अभ्यास केला जाणार आहे. शहरातील हवा प्रदूषणाची कारणे शोधण्यासाठी आणि उपाययोजना सुचविण्यासाठी एका अभ्यासक संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेला ७५ लाख रुपये दिले जाणार आहेत.शहरातील हवा प्रदूषणात सातत्याने भर पडत आहे. रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांमुळेही हवा खराब होत आहे. धुळीचे प्रमाण वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील हवा प्रदूषणाने सातत्याने धोकादायक पातळी ओलांडली आहे. शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक खराब श्रेणीत जात आहे. त्यामुळे महापालिकेने उपाययोजना हाती घेण्यास सुरुवात केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande