
अमृतसर, 19 डिसेंबर (हिं.स.) : पंजाबच्या अमृतसरमध्ये पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या एका टोळीचा भंडाफोड करत 3 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 4.5 किलोग्राम हेरॉईन आणि एक .30 बोरचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंह भुल्लर यांच्या माहितीनुसार, हे आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून परदेशात बसलेल्या एका हँडलरच्या संपर्कात होते आणि त्याच्या सूचनेनुसार हेरॉईन तसेच शस्त्रांची पुरवठा करत होते.
सीमा पार अमली पदार्थ तस्करीशी संबंधित या टोळीचा भंडाफोड करत पोलिसांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेले आरोपी इंटरनेट मीडियाच्या माध्यमातून परदेशात असलेल्या हँडलरशी संपर्क साधत होते आणि त्याच्या आदेशावरून हेरॉईन व शस्त्रांची खेप पोहोचवण्याचे काम करत होते, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.पोलीस आयुक्तांनी पुढे सांगितले की, सर्वप्रथम गुरविंदर सिंह उर्फ गोपी याला 1.5 किलोग्राम हेरॉईन आणि एक .30 बोरचे पिस्तूलसह ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपल्या आणखी दोन साथीदारांची नावे उघड केली. त्यानंतर पोलिसांनी तिलक आणि दलजीत सिंह यांनाही अटक केली.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी