ऑनलाइन बेटिंग प्रकरणात ईडीकडून युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांच्या मालमत्ता जप्त
नवी दिल्ली , 19 डिसेंबर (हिं.स.)।भारतीय क्रिकेट संघाचे दोन माजी खेळाडू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांची नावे ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात समोर आली होती. या प्रकरणात चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना समन्स बजावले होते. आता या प्रकरणात ई
ऑनलाइन बेटिंग प्रकरणात ईडीकडून युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांच्या मालमत्ता जप्त


नवी दिल्ली , 19 डिसेंबर (हिं.स.)।भारतीय क्रिकेट संघाचे दोन माजी खेळाडू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांची नावे ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात समोर आली होती. या प्रकरणात चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना समन्स बजावले होते. आता या प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाईकेली असून या दोघांची मालमत्ता जप्त केली आहे.

ईडीने युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांच्या मालमत्ता जप्त (अटॅच) करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये युवराज सिंग यांची 2.5 कोटी रुपयांची मालमत्ता, तर रॉबिन उथप्पा यांची 8.26 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. अंमलबजावणी संचालनालयाने 1xBet प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात या दोघांची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणात यापूर्वी ईडीने दोघांनाही चौकशीसाठी बोलावले होते. ईडीची ही कारवाई युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा दोघांसाठीही मोठा धक्का मानली जात आहे.

आजच्या कारवाईत ईडीने एकूण 7.93 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. याआधी याच प्रकरणात ईडीने माजी क्रिकेटपटू शिखर धवन यांची 4.55 कोटी रुपये, तर सुरेश रैना यांची 6.64 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. आतापर्यंत 1xBet प्रकरणात ईडी एकूण 19.07 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करू शकली आहे.

या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे. ईडीच्या माहितीनुसार, हे प्रकरण सुमारे 1,000 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित आहे. मागील महिन्यात ईडीने सांगितले होते की ऑनलाइन सट्टेबाजी संकेतस्थळ 1xBet विरुद्धच्या प्रकरणात धनशोधन प्रतिबंधक कायदा अंतर्गत शिखर धवन यांची सुमारे 4.5 कोटी रुपये आणि सुरेश रैना यांची 6.64 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande